Saturday, November 23, 2024
Homeनोकरीइंडियन ऑइल मध्ये विविध पदांसाठी मेघा भरती ; आत्ताच अर्ज करा, जाणून...

इंडियन ऑइल मध्ये विविध पदांसाठी मेघा भरती ; आत्ताच अर्ज करा, जाणून घ्या प्रक्रिया



इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये (IOCL) नोकरी करण्याचा विचार करणाऱ्या तरुणांसाठी चांगली संधी आहे. यासाठी IOCL ने (IOCL Recruitment 2021) गुवाहाटी, डिगबोई आणि बोंगाईगाव (आसाम) येथील रिफायनरीज / पेट्रोकेमिकल युनिट्ससाठी अर्ज मागवले केले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार (IOCL Recruitment 2021) जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात (IOCL Recruitment 2021) ते IOCLची अधिकृत वेबसाइट iocl.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची (IOCL Recruitment 2021) शेवटची तारीख 12 ऑक्टोबर आहे.


या शिवाय उमेदवार थेट या लिंकवर क्लिक करून https://iocl.com/latest-job-opening# या पदांसाठी अर्ज करू शकतात. तसेच उमेदवार या लिंकवर क्लिक करून
https://iocl.com/admin/img/UploadedFiles/LatestJobOpening भरती संदर्भातील अधिकृत सूचना (IOCL Recruitment 2021) देखील पाहू शकतात. या भरती प्रक्रियेअंतर्गत (IOCL Recruitment 2021) एकूण 533 पदे भरली जातील.

IOCL Recruitment 2021 साठी महत्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरु झालेली तारीख: 21 सप्टेंबर 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2021

IOCL Recruitment 2021 साठी रिक्त पदांचा तपशील
जूनियर इंजीनियरिंग असिस्टन्ट- IV (प्रोडक्शन) – 296 पदे
जूनियर इंजीनियरिंग असिस्टन्ट- IV (पी अँड यू) – 35 पदे
जूनियर इंजीनियरिंग असिस्टन्ट- IV (इलेक्ट्रिकल) / जूनियर टेक्निकल असिस्टन्ट- IV – 65 पदे
जूनियर इंजीनियरिंग असिस्टन्ट- IV (मॅकेनिकल) / जूनियर टेक्निकल असिस्टन्ट- IV- 27 पदे
जूनियर इंजीनियरिंग असिस्टन्ट- IV (इंस्ट्रुमेन्टेशन) / जूनियर टेक्निकल असिस्टन्ट- IV – 64 पदे
जूनियर क्वालिटी कंट्रोल अॅनालिस्ट -IV – 29 पदे
जूनियर इंजीनियरिंग असिस्टन्ट- IV (फायर अँड सेफ्टी) – 14 पदे
कनिष्ठ सामग्री सहायक – IV / कनिष्ठ तंत्रज्ञ सहायक- IV – 4 पदे
जूनियर नर्सिंग असिस्टन्ट- IV – 1 पद

IOCL Recruitment 2021 साठी आवश्यक पात्रता आणि निकष
जूनियर इंजीनियरिंग असिस्टेन्ट- IV (प्रोडक्शन) : उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून किमान 50% गुणांसह केमिकल/ रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा B.Sc (गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा औद्योगिक रसायनशास्त्र) पदवी असणे आवश्यक आहे.
जूनियर इंजीनियरिंग असिस्टन्ट- IV (पी अँड यू ): उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून मॅकेनिकल किंवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केलेला असावा.
जूनियर इंजीनियरिंग असिस्टन्ट- IV (इलेक्ट्रिकल) / जूनियर टेक्निकल असिस्टन्ट- IV : उमेदवारांनी किमान 50% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.
जूनियर इंजीनियरिंग असिस्टन्ट- IV (मॅकेनिकल) / जूनियर टेक्निकल असिस्टन्ट- IV :उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून किमान 50% गुणांसह फिटर ट्रेडमध्ये आयटीआयसह मॅट्रिक पास असणे आवश्यक आहे.
जूनियर इंजीनियरिंग असिस्टन्ट- IV (इंस्ट्रुमेन्टेशन) / जूनियर टेक्निकल असिस्टन्ट- IV : उमेदवारांनी किमान 50% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून इंस्ट्रूमेंटेशन / इंस्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स / इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा.
जूनियर क्वालिटी कंट्रोल अॅनालिस्ट -IV : उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून किमान 50% गुणांसह B.Sc, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र/ औद्योगिक रसायनशास्त्र आणि गणितामध्ये पदवी असणे आवश्यक आहे.
जूनियर इंजीनियरिंग असिस्टन्ट- IV (फायर अँड सेफ्टी) : एनएफएससी-नागपूरमधून मॅट्रिक प्लस सब-ऑफिसर्स कोर्स किंवा हेवी व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स असलेल्या इतर कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून समकक्ष (नियमित कोर्स) कोर्स केलेला असावा.
कनिष्ठ सामग्री सहायक – IV / कनिष्ठ तंत्रज्ञ सहायक- IV : उमेदवारांनी किमान 50% गुणांसह कोणत्याही मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकीमध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.
जूनियर नर्सिंग असिस्टन्ट- IV : उमेदवारांनी B.Sc. (नर्सिंग) किंवा मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून किमान 50% गुणांसह नर्सिंग आणि मिडवाइफरी किंवा स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्रातील 3 वर्षांचा डिप्लोमा केलेला असावा.
IOCL Recruitment 2021 साठी वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 26 वर्षांच्या दरम्यान असावी (सरकारी निकषांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सुट असेल).

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -