Monday, October 7, 2024
Homenewsआरोग्य विभागाची परीक्षा कधी होणार?, आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केली तारीख!

आरोग्य विभागाची परीक्षा कधी होणार?, आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केली तारीख!


आरोग्य विभागातील 6200 रिक्त पदांसाठी भरती होणार असून त्यासाठी 25 ते 26 सप्टेंबर रोजी परीक्षा घेण्यात येणार होती. पण हॉल तिकीटमध्ये (Hall Ticket) गोंधळ झाल्यामुळे आरोग्य विभागाने ही परीक्षा (maharashtra Health department exam) अचानक रद्द केली त्यामुळे परीक्षार्थींकडून संताप व्यक्त केला जात आहे. ही परीक्षा पुढे ढकलल्यामुळे भाजपने संतप्त होत आरोग्य मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता ही परीक्षा पुन्हा कधी घेण्यात येणार याकडे परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगतिले की, ‘विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. ही परीक्षा रद्द नाही तर लांबणीवर टाकण्यात आली आहे. आरोग्य विभागाची बैठक घेऊन लवकरच या परीक्षेची पुढील तारीख जाहीर केली जाईल.

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, ‘आरोग्य विभागाच्या परीक्षेची तारीख सांगण्यात आली नसली तरी सुद्धा 15 ते 16 ऑक्टोबर किंवा 22 ते 23 ऑक्टोबरला या परीक्षा घेण्यात येण्याची शक्यता आहे. पण या संभाव्य तारखा असतील. अशामध्ये शाळा सुद्धा सुरु होणार आहेत. त्यामुळे त्याचे नियोजन बघूनच आरोग्य विभागाच्या परीक्षेच्या पुढील तारखा ठरवल्या जातील’

अशामध्ये, ‘आयटी डिपार्टमेंटने (IT Department) मागच्या सरकार आणि या सरकारच्या अनुषंगाने कंपन्यांचे सिलेक्शन केले आहे. आरोग्य विभागाची एकच जबाबदारी होती ती म्हणजे प्रश्नपत्रिका तयार करणे. त्यामुळे ती कंपनी ब्लॅकलिस्ट आहे की नाही हे पाहणे आयटी डिपार्टमेंटचे काम असते. सामान्य प्रशासनाअतंर्गत असलेल्या आयटी डिपार्टमेंटने मागचे सरकार आणि आताचे सरकार या अनुषंगाने कंपन्यांचे सिलेक्शन केले आहे. त्यामुळे ही कंपनी आरोग्य विभागाने सिलेक्ट केलेली नाही. आमच्या विभागाचा आणि याचा काहीही संबंध नाही.’, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आरोग्य विभागातील पद भरतीसाठी 26 सप्टेंबर रोजी परीक्षा (Health Department Recruitment 2021) घेण्यात येणार होती. राज्यभरात जवळपास 8 लाख उमेदवार परीक्षा देणार होते. पण हॉल तिकिटामध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आढळून आला. हॉल तिकीटमध्ये अनेक चुका असल्याचे समोर आले. त्यामुळे अखेर आरोग्य विभागाकडून ही परीक्षा रद्द करण्यात आली. पुढील परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -