Monday, May 27, 2024
Homeमनोरंजनतीनच गाणे पण शिट्ट्या? इंदोरीकर महाराजांचा गौतमी पाटीलवर निशाणा

तीनच गाणे पण शिट्ट्या? इंदोरीकर महाराजांचा गौतमी पाटीलवर निशाणा

आपल्या वक्तव्यांनी सतत चर्चेत राहणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. थोडं आपली संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचा सल्ला इंदोरीकर महाराजांनी उपस्थितांना दिलाय.

इंदुरीकर यांनी, तिने 3 गाणी वाजवली लोक दीड दीड लाख देतात. पण आम्ही 5 हजार रुपये जास्त मागितले तर लोकं म्हणतात यांनी बाजार मांडला. याच्याआधी बीडमधील आष्टी तालुक्यातील तवलवाडी या गावात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनातून गौतमी पाटील हिचे नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर त्यांनी बीडनंतर आता शिर्डी येथे कीर्तनादरम्यान ही टीका केली आहे.

तर तीनच गाणे पण शिट्ट्या? गाडा आला आणि घाटात राडा झाला, असे म्हणत, थोडं आपली संस्कृती टिकवणं गरजेचं असल्याचा सल्ला इंदोरीकर महाराजांनी उपस्थितांना दिलाय.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -