मीत्र, मैत्रिणी, कुटुंबीय, परदेशातील व्यक्तींच्या संपर्कात राहण्यासाठी सध्या व्हॉट्सअॅप हा एक बेस्ट पर्याय आहे. परंतु अनेकदा व्हॉट्सअॅपमुळे तुम्ही गोत्यात येण्याचे प्रकार घडतात.
जसे की, जॉबवर तुम्ही महत्वाचे काम सांगू सुट्टी घेतली असेल आणि व्हॉट्सअप स्टेट्सवर तुम्ही फिरायला गेलेल्या ठिकाणाचे फोटो टाकले आणि तेच फोटो दुर्दैवाने तुमचा बॉस बघतो, तर अशावेळी तुम्हाला ओरडा पडणार हे निश्चित असते. यामुळे सोईचे वाटणारे व्हॉट्सअॅप अनेकदा अडचणीत आणते. परंतु तुम्हाला व्हॉट्सअपच्या या त्रासापासून वाचायचे असेल तर आम्ही तुम्हाला काही बेस्ट टिप्स देणार आहोत. यामुळे तुम्ही WhatsApp वर सक्रिय असूनही इतरांना तुम्ही Invisible असल्याचे दाखवू शकता. पण यासाठी तुम्हाला खालील काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.
१) Last seen आणि Online स्टेटस हाइड करा.
अनेकदा तुम्ही कामात बिझी असता, त्यावेळी व्हॉट्सअॅप चॅटिंग बॉक्समध्ये आलेल्या मेसेजला वेळेवर रिप्लाय करता येत नाही. अशावेळी लास्ट सीन हाइड करून ठेवणे एक बेस्ट ऑप्शन आहे. यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅपवर दिसणारे लास्ट सीन स्टेटस बदलावे लागेल. लास्ट सीन स्टेटस ऑन किंवा ऑफ करण्यासाठी सर्वप्रथम WhatsApp च्या Settings > Privacy > Last seen and online वर जाऊन Last seen मध्ये Nobody पर्याय निवडा. online मध्ये तुम्हाला पाहिजेस तुम्ही इतरही पर्याय निवडू शकता.
२) Read Receipts ऑप्शन टर्न ऑफ करा.
तुम्हाला लास्ट सीन आणि ऑनलाइन स्टेटसमुळे होणाऱ्या त्रासातून स्वतःची सुटका करून घ्यायची असल्यास रीड रीसिप्ट्स ऑप्शन टर्न ऑफ करून ठेवा. व्हॉट्सअॅपच्या चॅट बॉक्समध्ये येणाऱ्या मेसेजला रिप्लाय देण्यासोबतच तुम्हाला रीड रिसिप्ट रीसिप्ट ऑप्शन बंद करून इतर अनेक फायदे मिळतात. यामुळे तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील कोणाच्या मेसेजला रिप्लाय देण्यात तुम्हाला इंटरेस्ट आहे ते तुम्ही ठरवू शकता. अशा स्थितीत समोरच्या व्यक्तीला आपण त्याचा मेसेज पाहिला की नाही हे देखील कळणार नाही.
३) स्टेट्स अपडेटवर लिमिट ठेवा.
आत्तापर्यंत सर्व स्टेटस अपडेट्स ठराविक कॉन्टॅक्ट्सपर्यंत मर्यादित ठेवण्याची किंवा काही कॉन्टॅक्ट्सपासून लपवण्याची सुविधा होती. पण फेब्रुवारीमध्ये नवीन व्हॉट्सअॅप अपडेट आल्यानंतर आता युजरला वेगवेगळ्या स्टेटससाठी लिमिट सेट करण्याची सुविधा मिळाली आहे. व्हॉट्सअॅपवर स्टेटस अपलोड करताना तुम्ही आधी स्टेटस प्रायव्हसी चेक केली पाहिजे.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही कॉन्टॅक्ट लिस्टमधील व्हॉट्सअॅप युजर्सला तुमचे स्टेटस दिसेल अशी प्रायव्हसी सेट करू शकता. यासाठी तुम्ही status वर जाऊन status Privacy वर जा. यात पहिलेच ऑप्शन आहे My Contacts त्यावर क्लिक करा. यानंतर दुसरे ऑप्शन Only Share With हे आहे, ज्यात तुम्हाला पाहिजे त्याच व्यक्तींनी तुमचे स्टेटस पाहावे असेल वाटत असल्यास तेवढ्याच व्यक्ती सेलेक्ट करू शकता. यामुळे तुमचे स्टेटस तुम्ही सिलेक्ट केलेल्या व्यक्तीचं पाहू शकतील इतर कोणीही नाही. यासाठी तुम्ही WhatsApp च्या Settings > Privacy > Status मध्ये जाऊन पाहिजे ती स्टेटस लिमिट सेट करू शकता.
४) Profile photo हाइड करा
व्हॉट्सअॅपमध्ये तुम्हाला तुमचा प्रोफाइल फोटो देखील हाइड करून ठेवता येतो. यातही तुम्हाला लास्ट सीन स्टेटिंगमध्ये दिसणारे Everyone, My Contacts, My Contacts except आणि Nobody असे ऑप्शन आहे. जर तुम्हाला तुमचा फोटो कोणालाही दिसू नये असे वाटत असल्यास तुम्ही Nobody हे ऑप्श सेलेक्ट करा. तसेच कॉन्टॅक्टमधील काही ठरावीक लोकांनाच प्रोफाइल फोटो दिसावा असे तुम्हाला वाटत असल्यास My Contacts except वर जाऊन तुम्ही ते ठरावीक कॉन्टक्ट निवडा. प्रोफाइल फोटो हाइड करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या Settings > वर जाऊन Privacy > Profile photo > Nobody steps वर क्लिक करावे लागेल.
५) About मध्ये लिहिलेली गोष्ट हाइड करा.
वरील चार पर्याय तुमच्या सोईप्रमाणे सेट केल्यानंतर, तुमच्या WhatsApp वर जर कोणती गोष्ट शो होत असेल तर ती म्हणजे About. यामध्ये तुम्ही तुमच्याबद्दल लिहिलेल्या गोष्टी हाइड करून ठेऊ शकता. यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅपच्या सेटिंग ऑप्शनवर जाऊन Settings > Privacy > About या स्टेप्स फॉलो करून मर्यादा सेट करू शकता.
तुम्हाला वेळेवर रिप्लाय द्यायचा नसेल किंवा या रिप्लायच्या त्रासापासून वाचण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअॅप इन्स्टंट मेसेजिंग अॅपवर असूनही Invisible दिसू शकता.
WhatsApp वर अॅक्टिव्ह असूनही इतरांना तुम्हाला Invisible असल्याचे दाखवायचे आहे? मग फॉलो करा ‘या’ स्टेप्स
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -