Tuesday, July 8, 2025
Homeब्रेकिंगसलमान खानच्या Smile वर असंख्य चाहते फिदा, एक्स गर्लफ्रेंड ही स्वत:ला रोखू...

सलमान खानच्या Smile वर असंख्य चाहते फिदा, एक्स गर्लफ्रेंड ही स्वत:ला रोखू शकली नाही

‘मुझपे एक एहसान करना, मुझसे कोई एहसान मत करना।, ‘हम यहां के रॉबिनहुड पांडे है, रॉबिनहुड पांडे… स्वागत नहीं करोगे आप हमारा?’, ‘आम आदमी सोता हुआ शेर है, उंगली मत कर जाग गया तो चीर फाड़ देगा।’, ‘मेरे बारे में इतना मत सोचो… मैं दिल में आता हूं, समझ में नहीं’… असे अनेक डायलॉग स्वतःच्या खास अंदाजात म्हणत अभिनेता सलमान खान याने चाहत्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सलमान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. आता देखील सलमान एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर सलमान खान याचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे.

सलमान खान याने सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्याने कॅप्शनमध्ये ‘Hey’ असं लिहिलं आहे. सलमान खान याने फोटो पोस्ट केल्यानंतर काही क्षणात असंख्य चाहत्यांनी भाईजानच्या फोटोवर कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला. सध्या सलमान खान याचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सलमान खान याच्या एका Smile वर चाहतेच नाही तर, एक्स गर्लफ्रेन्ड देखील फिदा झाली आहे. भाईजानचा फोटो पाहिल्यानंतर एक्स गर्लफ्रेन्ड आणि अभिनेत्री संगीता बिजलानी स्वतःला थांबवू शकली नाही आणि सलमानच्या कॅप्शनवर कमेंट करत म्हणाली, ‘Hey’… संगीताने सलमानच्या फोटोवर कमेंट केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

फोटोमध्ये सलमान खान प्रचंड हँडसम दिसत आहे. अनेकांनी भाईजानच्या फोटोवर ‘डॅशिंग…’ अशी कमेंट केली आहे. सलमान खान याच्या फोटोला १३ तसांमध्ये तब्बल १७ लाख पेक्षा जास्त लोकांना लाईक केलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या फोटोचीच चर्चा रंगत आहे.

सलमान खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता लवकरच ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. एप्रिल महिन्यात ईदच्या मुहूर्तावर सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात सलमान याच्यासोबत अभिनेत्री पूजा हेडगे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. एवढंच नाही तर, किसी का भाई किसी की जान सिनेमातून अभिनेत्री शहनाज गिल बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

सध्या सर्वत्र सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे. सिनेमात टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी हिची मुलगी पलक तिवारी देखील झळकणार असल्याची चर्चा रंगत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -