Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरगुंड चिन्याच्या खुनातील संशयिताच्या घरावर हल्ला; आईसह दोघे जखमी

गुंड चिन्याच्या खुनातील संशयिताच्या घरावर हल्ला; आईसह दोघे जखमी

कुख्यात गुंड चिन्या हळदकर याच्या खुनातील संशयित सुधीर तुकाराम मोरे (वय 25, रा. दौलतनगर, कोल्हापूर) याच्या घरावर पाच ते सहा जणांनी दगडफेक करून हल्ला केला.

त्याला जीवे मारण्याचीही धमकी दिल्याने परिसरात पुन्हा गँगवॉर भडकण्याची शक्यता आहे. दौलतनगर येथील चौकात हा प्रकार घडला. या घटनेत सुधीरसह त्याची आई जखमी झाली.

सुधीरची आई लता मोरे (रा. दौलतनगर) यांनी राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संशयित हल्लेखोर विनायक जाधव (माऊली चौक), निखिल गायकवाड ( प्रतिभानगर), सुरेश डोकरे, अभिषेक हवालदार, करण चव्हाण (रा. शाहूनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हळदकर खुनातील संशयित मोरे याला जामीन मिळाल्याने त्याची कळंबा कारागृहातून सुटका झाली आहे. रविवारी सकाळी तो घरी होता. संशयितांनी त्याच्या घराजवळ जाऊन त्याला शिवीगाळ केली. तू चिन्याला का मारलेस,आता तुला सोडणार नाही, अशी धमकी देत मोरे याच्या घराच्या दिशेने दगड आणि विटा भिरकावल्या. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -