कांदलगाव (ता.करवीर) येथे चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलासह चारजणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जेरबंद केले. त्यांच्याकडून चोरीच्या ११ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. रवी नामदेव पवार (२१ रा.पारधी वसाहत, उचगाव ), सुनील वसंत वळकुंजे ( वय १९ रा. धनगर गल्ली, उचगाव) अशी संशयितांची नावे आहेत. यामध्ये व दोन अल्पवयीन मुलांना समावेश आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने त्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे यांना गोपिनीय माहिती मिळाली होती कि, मालेमुडशिंगी येथील साहिल कुरणे याची चिंचवाड, ता. करवीर येथून चोरी झालेली दुचाकी उचगाव येथील रवी पवार याने व त्याचे साथीदारानी चोरलेली आहे. ती दुचाकी विकण्याकरीता कंदलगांव रोडवर येणार आहे. त्यानुसार अ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कंदलगाव रोडवर सापळा ल रचून रवि पवार, सुनिल वळकुंजे म उचगांव, (ता. करवीर) यांच्यासह त त्यांचे सोबत असलेल्या दोन डं अल्पवयीन मुलांना त्यांच्याकडील ई दुचाकीसह ताब्यात घेतल्या. त्या स सर्वांनी मिळुन गेले चार ते पाच महिन्यांमध्ये शहापूर, हुपरी, वडगांव, शिरोली दुमाला, वसगडे, चिंचवाड जि. कोल्हापूर व पट्टणकुडी ता. चिक्कोडी या ठिकाणावरुन एकूण ९ दुचाकी चोरल्याची कबुली.त्यांच्याकडून एकूण ११ दुचाकी यं जप्त करण्यात आल्या.