हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथलं प्रसिद्ध देवस्थान श्री विठ्ठल बिरदेव मंदिर असून देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिराच्या सर्व धार्मिक कार्यक्रमात मानाचे अश्व म्हणजे घोड्याचे महत्व अधोरेखित आहे. मंदिरातील श्रीमूर्तीच्या बरोबरच या श्री अश्वालाही भाविक मोठ्या भक्ती भावाने पुजत होते. गेल्या पंधरा दिवसापासून आश्वाची तब्येत नरम गरम होती. आज या अश्व श्रीचे (घोडा) आज निधन झाले. याची माहिती सोशल मीडिया द्वारे समजतात भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दाखल झाले.
अलीकडच्या काही वर्षापासून श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान हे महाराष्टासहित अनेक राज्यांतुन दररोज दर्शनासाठी भाविक येत आहेत. प्रसिद्ध आहे. दैनंदिन आरतीला, पाचजण पुजारी कार्यक्रमाला, विविध धार्मिक विधींना आणि यात्रेमधील प्रसिद्ध भाकणूकीवेळी या श्री अश्वाचा आणि छत्र्यांचा मान असतो. आज सकाळी अचानकच या श्री अश्वाचे निधन झाले. त्यामुळे ग्रामस्थ व भक्तांमधून हळहळ व्यक्त केली जात होती. त्याच्या निधनानंतर येथील देवमळा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ठिकाणी त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भाविक, ग्रामस्थ व पंच कमिटी सदस्य उपस्थित होते.