Monday, May 27, 2024
Homeक्रीडाIPL 2023 : फिरकीपटूंचे मदतीने होम ग्राऊंडवर के. एल. राहुल पंजाब किंग्जला...

IPL 2023 : फिरकीपटूंचे मदतीने होम ग्राऊंडवर के. एल. राहुल पंजाब किंग्जला रोखणार का?

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल त्यांच्या घरच्या मैदानावर विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. कोचिंग स्टाफमध्ये समाविष्ट असलेला अँडी फ्लॉवर यासाठी नियोजन करीत असून, मधल्या फळीत दीपक हुडा आणि निकोलस पूरन यांचा अधिक चांगला वापर करण्याचीही चर्चा आहे. यासोबतच के. के. गौतम आणि रवी बिश्नोईच्या फिरकी गोलंदाजीचा पुरेपूर वापर करून ते पंजाब किंग्जला खिंडार पाडण्याचा प्रयत्न करतील.

लखनौ सुपर जायंट्सने घरच्या मैदानावर पराभूत करणे कठीण असलेला संघ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. याआधी घरच्या मैदानावर एकना स्टेडियमवर खेळले गेलेले दोन्ही सामने लखनौ सुपर जायंट्सने जिंकले आहेत. लखनौ सुपर जायंट्सने या मोसमात खेळल्या गेलेल्या चारपैकी तीन सामने जिंकले असून, गुणतालिकेत दुसरे स्थान कायम राखले आहे. त्याचा एकमेव पराभव चेन्नई सुपर किंग्जकडून झाला.

त्याचबरोबर या मोसमात सलग दोन सामने जिंकल्यानंतर पंजाब किंग्जच्या संघाने दोन सामन्यांत पराभवाची चव चाखली आहे. कोलकाता आणि राजस्थानविरुद्ध सलग दोन सामने जिंकणाऱ्या शिखर धवनच्या संघाची मधली फळी ढासळत चालली आहे. त्यामुळे त्यांना सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.

2022 मध्ये दोन्ही संघांमध्ये फक्त एक सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जचा 20 धावांनी पराभव केला होता. पुण्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात लखनौला सुपर जायंट्सने दिलेल्या १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. यावेळी लखनौ सुपर जायंट्स पंजाब किंग्जला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत करून विजयी विक्रम कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.

लखनौ सुपर जायंट्स त्यांच्या टॉप ऑर्डर बॅटिंगमध्ये क्विंटन डी कॉकला काइल मेयर्सपेक्षा प्राधान्य देऊ शकतात. त्याचवेळी पंजाबकडून खेळण्यासाठी आलेला लियाम लिव्हिंगस्टोन गुडघा आणि घोट्याच्या दुखापतीनंतर उशिरा भारतात पोहोचला आहे, मात्र खुद्द शिखर धवनने त्याच्या खेळण्याबाबत दुजोरा दिलेला नाही. तो पुढील आठवड्यात आरसीबीविरुद्ध खेळण्यासाठी उपलब्ध होऊ शकतो. या सामन्यात शिखर धवनसमोर जयदेव उनाडकट आल्यास धवन पुन्हा एकदा वर्चस्व गाजवू शकतो. जेव्हा ते आयपीएलमध्ये एकमेकांसमोर आले होते, तेव्हा धवन चांगला खेळला आहे. त्याच्याविरुद्ध धवनने 44 चेंडूत 70 धावा केल्या आहेत आणि तो फक्त एकदाच बाद झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -