Thursday, May 30, 2024
Homeजरा हटकेमालदिवमध्ये दिसला तारा सुतारियाचा ग्लॅमरस अंदाज, समुद्र किनारी काढलेले फोटो व्हायरल

मालदिवमध्ये दिसला तारा सुतारियाचा ग्लॅमरस अंदाज, समुद्र किनारी काढलेले फोटो व्हायरल

तारा सुतारिया ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने फार कमी वेळात स्वत:ची चांगली ओळख निर्माण केली आहे. दुसरीकडे, तिच्या लूकमुळे ती सोशल मीडियावर  नेहमीच चर्चेत असते. कधी ती इन्स्टाग्रामवर व्हिडिओ तर कधी फोटो शेअर करत असते, जे तिच्या चाहत्यांना खूप आवडतात. सध्या तारा सुतारिया तिच्या एका लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून ती मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. आणि तिथून ती एकामागून एक ग्लॅमरस फोटो शेअर करत आहे. तसाच तिचा अलीकडचा आणखी एक फोटोही चर्चेत आला आहे.

ताराने नुकताच जो फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये ती निऑन कलरच्या बिकिनी लूकमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर तिच्या खुल्या केसांमुळे तिचा किकलर लूक फ्लॉन्ट होत आहे. समुद्राच्या अदी जवळ उभा राहून आकाशाकडे पाहणारी तारा अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. तारा सुतारियाने तिचे हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले असून तिचे आणखीही विविध फोटो दिसत आहेत. तिच्या या फोटोचे लोकं खूप कौतुक करत असून चाहत्यांनी अनेक कॉमेंट्सही केल्या आहेत.

याआधीही तिने याच लूकमधला आणखी एक फोटो शेअर केला होता, ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. या फोटोत ती आडवी पडलेली दिसत आहे. तिच्या लूकसोबतच तारा सुतारिया तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही चर्चेत राहते. काही महिन्यांपूर्वी ती आदर जैनला डेट करत होती. दोघं लवकरच लग्न करणार आहेत, असा अंदाजही अनेक लोकांनी व्यक्त करायला सुरुवात केली होती. मात्र, अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांचे काही महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाले.

तारा सुतारियाच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, तिने 2019 मध्ये स्टुडंट ऑफ द इयर 2 या चित्रपटामधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. नंतर तिने हिरोपंती 2, एक व्हिलन रिटर्न्स सारख्या इतर चित्रपटात काम केले. आणि आज ती खूप लोकप्रिय आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -