बिग बॉस फेम शिव ठाकरे ने काहीच दिवसापूर्वी एक नवीन आलीशान गाडी खरेदी केली होती. या गाडीची सर्वत्र चर्चा झाली. या गाडीचे फोटोही व्हायरल झाले होते. पण ही गाडी घेऊन शिव नुकताच त्याच्या गावी गेला. यावेळी गाडी पाहून त्याची आई भारावून गेली. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर शिवने नवी कोरी कार खरेदी केली. जवळपास ३० लाख किंमतीची ‘टाटा हॅरिअर’ ही गाडी त्याने खरेदी केली आहे. याच गाडीचा आता शिवच्या आई सोबतचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. शिव आपली नवीन गाडी घेऊन गावी गेला होता. यावेळी शिवची नवी गाडी पाहिल्यानंतर त्याच्या आईचा आनंद गगनाच मावेनासा झाला. शिवची आई गाडीची पूजा करते. गाडीतील गणपतीच्या मूर्तीची ही पूजा करते. त्यानंतर शिव त्याच्या नव्या कोऱ्या गाडीमधून कुटुंबियांना फिरायला घेऊन जातो. यावेळी सगळेच आनंदात दिसतात. हा व्हिडिओ सध्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -