Saturday, September 21, 2024
Homeकोल्हापूरबिंदु चौकात तर शड्डू ठोकला आता कारखाना कोण जिंकणार?; राजारामसाठी मतदान 'या'...

बिंदु चौकात तर शड्डू ठोकला आता कारखाना कोण जिंकणार?; राजारामसाठी मतदान ‘या’ दिवशी

अख्या जिल्ह्यासह राज्याने आणि देशानेही 14 एप्रिलला छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा फिव्हर पाहिला. येथील ऐतिहासिक बिंदु चौकात कारखान्याच्या निवडणुकीवरून आमदार सतेज पाटील, महाडिक गट आमने सामने येणार म्हटल्याने पोलिसांसह जिल्ह्याचं टेन्शन वाढलं होतं. पण वेळ टळली आणि अनर्थही. त्यानंतर या देन्ही नेत्यांवर स्थानिक वृत्तपत्र आणि सोशल मीडियावरून कडाडून टीका झाली. या सगळ्या नाट्यानंतर आता मतदानाचा दिवस उजाडणार आहे.

राजारामसाठी 23 एप्रिलला मतदान प्रक्रिया होणार असून कारखान्यासाठी 57 मतदान केंद्रांवर होणार मतदान पार पडणार आहे. याच्याआधी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मतदान केंद्राची यादी जाहीर केली आहे. तर कोल्हापूर शहरात पाच ठिकाणी मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे. तर करवीर आणि हातकणंगले तालुक्यात सर्वाधिक मतदान केंद्र आहेत. एका मतदान केंद्रावर दीडशे ते तीनशे मतदारांना करता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -