Saturday, September 21, 2024
Homeकोल्हापूरकर्नाटक राज्याला महाराष्ट्राचे पाणी मिळू देणार नाही, कोल्हापुरातील शिवसैनिकांचा निर्धार

कर्नाटक राज्याला महाराष्ट्राचे पाणी मिळू देणार नाही, कोल्हापुरातील शिवसैनिकांचा निर्धार

कर्नाटकातील काही जिल्ह्यांची पाणी टंचाई दूर करण्यासाठी महाराष्ट्रातून अतिरिक्त सहा टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला केली आहे, मात्र कर्नाटक राज्याला महाराष्ट्राचे पाणी मिळू देणार नाही, असा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी केला आहे.

सीमाभागातील मराठी बांधवांवर कानडी सरकार वर्षानुवर्षे अत्याचार करीत आहे. पाण्याची गरज पडल्यास महाराष्ट्राची आठवण येते, परंतु सीमाभागात राहणाऱया मराठी माणसांचे कर्नाटक सरकारला सोयरसुतक नाही. कानडी सरकारच्या या दुटप्पी भूमिकेला महाराष्ट्र सरकारने कडाडून विरोध करायला हवा, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कोल्हापूर जिह्यातील सर्व शिवसैनिकांनी केली. कोल्हापूरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शिवसैनिकांनी निषेध नोंदविला.कर्नाटक जलसंपदा विभागाने महाराष्ट्र जलसंपदा विभागास पत्र पाठवले असून उत्तर कर्नाटकातील जिह्यांसाठी वारणा व कोयना जलाशयातून कृष्णा नदी पात्रात तीन टीएमसी पाणी सोडावे अशी मागणी केली आहे. यंदाचा उन्हाळा अजून मध्यात असतानाच कोल्हापूरातील कृष्णा, पंचगंगा, वारणा व दुधगंगा नदीपात्रे कोरडी पडली आहेत. यंदा पाऊस कमी झाल्यास कोल्हापूरातील नागरिकांना गंभीर पाणी टंचाईस सामोरे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकच्या या मागणीला शिवसेनेने विरोध केला आहे.

कर्नाटक सरकारच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे अलमट्टी धरणातून योग्य प्रमाणात पाण्याचा विसर्ग न केल्याने महापूराचा सर्वाधिक फटका शिरोळ व हातकणंगले तालुक्याला बसला. मात्र क्षमता असतानाही पुराचे पाणी कर्नाटकात घेण्यास तेथील सरकार टाळाटाळ करते. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी कर्नाटकला पळविण्याचा घाट कर्नाटक सरकार घालत आहे. महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर व सांगली जिह्यातील टंचाईग्रस्त भागासाठी पाणी राखून ठेवावे. कर्नाटकच्या भावनिक नाटकाला सरकार बळी पडणार असेल, तर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा कोल्हापूर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -