Monday, February 23, 2026
Homeअध्यात्मअक्षय तृतीयेला करा या वस्तूंचे दान; दहापट पुण्य मिळवा!

अक्षय तृतीयेला करा या वस्तूंचे दान; दहापट पुण्य मिळवा!

मित्रांनो 22 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आलेली आहे. अक्षय तृतीया या दिवशी अनेक नवीन कामांची सुरुवात केली जाते. तसेच अनेक वस्तूंची खरेदी देखील अक्षय तृतीयेला केली जाते. मित्रांनो हिंदू धर्मांमध्ये अनेक सणांना विशेष असे महत्त्व दिले गेलेले आहे. त्यापैकीच अक्षय तृतीयेला देखील खूपच अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा एक महत्त्वाचा दिवस मानला गेलेला आहे.

या दिवशी दान केल्याने आपली अडकलेली कामे पूर्ण होतात. तसेच आपली जर प्रगती होत नसेल तर तुम्ही तर अक्षय तृतीयेला वस्तूंचे दान करणे खूपच शुभ मानले गेलेले आहे. त्यामुळे आवर्जून तुम्ही अक्षय तृतीयेला दान करायचे आहे. जेणेकरून त्याचा लाभ तुम्हालाच होईल. अक्षय याचा अर्थ म्हणजेच कधीही क्षय न पावणारे म्हणजेच कधीही न संपणारे त्यामुळे अक्षय तृतीयेला दान करणे खूपच महत्त्वाचे मानले गेलेले आहे.

तसे तर आपण अक्षय तृतीयेला अनेक नवीन वस्तूंची खरेदी करतो. म्हणजेच गाडी घेणे, सोने घेणे अशा अनेक वस्तूंची खरेदी करत असतो. परंतु अक्षय तृतीयेला दानाचे देखील खूपच अननसाधारण असे महत्त्व आहे. तर तुम्हाला तुमची प्रगती करायची असेल तसेच अडलेली कामे पूर्ण व्हावीत असे जर वाटत असेल तर तुम्ही दान करून पुण्याची प्राप्ती करू शकता.

या दिवशी आपण अन्न, दूध, दही या वस्तूंचे दान केले तर ते खूपच शुभ मानले गेलेले आहे. तसेच असे मानले जाते की दान केल्याने आपणाला पुण्याची प्राप्ती होते तसेच आपल्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होते. म्हणजेच तुम्हाला जे काही उत्पन्न मिळालेले आहे त्यातील थोडेसे जरी तुम्ही दान केले तर तुमच्या उत्पन्नामध्ये दहा पटीने वाढ होते. तर तुम्ही अक्षय तृतीयेला जवस, शेंगदाणे, वाटाणे, मसूर डाळ, तूर डाळ, काकडी, पाण्याची भांडी अशी अनेक वस्तू तुम्ही जर या दिवशी दान केले तर तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होते. यामुळे अनेक शुभ फळे आपल्याला प्राप्त होतात.

तसेच तुम्ही अक्षय तृतीयाला जर पाण्याने भरलेला माठ दान केला तर यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पाणी दान केल्याने एक प्रकारचे जीवदान दिल्यासारखे होते. त्यामुळे तुम्ही अक्षय तृतीयेला पाण्याचा माठ देखील दान करू शकता.

तर मित्रांनो वरील सांगितल्याप्रमाणे यापैकी कोणत्याही वस्तू जर तुम्ही अक्षय तृतीयेला दान केला तर तुम्हाला नक्कीच पुण्याची प्राप्ती होईल. तुमच्या उत्पन्नामध्ये दहा पटीने वाढ होत राहील. तर तुम्ही देखील कोणत्याही वस्तूचे दान अक्षय तृतीयेला आवश्य करा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -