सनरायजर्स हैदराबादचा सामना आयपीएलच्या चार वेळच्या विजेत्या चेन्नईसोबत होणार आहे. चेपॉक मैदानावर सामना होणार आहे, येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करते.. त्यामुळे आज फिरकी गोलंदाजांचा दबदबा पाहायला मिळू शकतो. बेन स्टोक्स तंदुरस्त झाला असून आजच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल.. दुखापतीमुळे मागील तीन सामन्यासाठी स्टोक्स उपलब्ध नव्हता… बुधवारी स्टोक्सने सराव सत्रात सहभाग घेतला होता. त्यामुळे आज स्टोक्स उपलब्ध आहे. चेन्नईसाठी ही जमेची बाजू आहे. पण धोनीच्या खेळण्याबाबत संभ्रम आहे. डेवोन कॉनवे आणि ऋतुराज गायकवाड या सलामी जोडीची दमदार कामगिरी आणि शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणे यांचे आक्रमक रुप चेन्नईला मोठी धावसंख्या उभारून देत आहेत. पण इतर फलंदाजांकडून योगदान मिळत नाही. सनरायजर्स हैदराबादला मुंबई इंडियन्सविरोधात पराभवाचा सामना करावा लागला होता. आता ते विजयाच्या पटरीवर परतण्यासाठी सज्ज आहेत. हैदराबादच्या कामगिरीत सातत्य दिसत नाही. फलंदाज आपली कामगिरी चोख बजावत नाहीत. चेन्नईला घरच्या मैदानावर हरवायचे असल्यास हैदराबादच्या फलंदाजांना आपली कामगिरी चोख बजावावी लागेल. मागील सामन्यात हैदराबादच्या फलंदाजांनी हराकिरी केली होती. पावरप्लेमध्ये विकेट फेकल्या होत्या. हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, कालसेन, मार्करम, अभिषेक शर्मा यांना योगदान द्यावे लागेल. सुंदर आणि समद यांन अखेरीस फिनिशिंग टच देण्याची गरज आहे. हैदराबदच्या फलंदाजीत सातत्याची कमी दिसत आहे. आजचा सामन्यात बाजी मारायची असल्यास सांघिक कामगिरी गरजेची आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -