क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा आज वाढदिवस आहे आणि सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या औंढी येथे मास्टर-ब्लास्टर सचिनचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला आहे.गावातल्या प्रत्येक घरावर गुढीसोबत बॅट उभारून आणि दारात रांगोळ्यांचा सडा,भव्य मिरवणूक,अशा दिमाखात “तेंडल्या” चित्रपटाच्या टीमने आगळ्यावेगळ्या पद्धतीने मास्टर-ब्लास्टर सचिनचा वाढदिवस साजरा केला आहे.
ग्रामीण भागातील सचिन तेंडुलकरची लोकप्रियता आणि सचिनच्या फॅन्सवर आधारित सांगलीच्या वाळव्यातील सचिन जाधव यांनी “तेंडल्या”हा चित्रपट बनवला आहे. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातल्याच शिराळा,वाळवा तालुक्यातल्या बालकलाकारांना घेऊन या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. 5 मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
त्याआधीच या चित्रपटाला पाच राज्यस्तरीय आणि चित्रपटातील बालकलाकाराला राष्ट्रीय पारितोषक मिळाले आहे. तर चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी सचिचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला आहे. “तेंडल्या”चित्रपटाची संकल्पना ज्या गावातून चित्रपट निर्मितीची प्रेरणा मिळाली,त्या औढी गावात सचिनचा वाढदिवस अगदी दिमाखात साजरा करण्यात आला आहे.
गावामध्ये प्रत्येक घरावर या निमित्ताने बॅट लावून गुढ्या उभारण्यात आल्या. तसेच प्रत्येक घराच्या दारामध्ये रांगोळ्यांचा सडा देखील काढण्यात आला होता. कुठे सचिनचे चित्र तर कुठे सचिनचे नाव आणि सचिनचे भले मोठे पोस्टर उभारण्यात आले होते.
त्याचबरोबर सचिनच्या प्रतिमेचे पालखीतून भव्य, अशी मिरवणूक देखील काढण्यात आली. ज्यामध्ये “तेंडल्या”चित्रपटाची आख्खी टीम,गावकरी आणि प्रसिद्ध क्रिकेट समालोचक सुनंदन लेले हे देखील सहभागी झाले होते. सुनंदन लेले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सचिनचा हा वाढदिवस औंढी गावात मोठ्या दिमाखात पार पडला आहे.
गावातील ग्रामपंचायत समोर सचिन तेंडुलकरचा भव्य पोस्टर उभे करण्यात आला होते.. या पोस्टरच्या अनावरण करून सचिनला औक्षण करत त्याला नैवेद्य म्हणून त्याचा आवडता खाद्यपदार्थ 100 वडापाव अर्पण करण्यात आलं. मोठ्या धुमधडाक्यामध्ये औंढी गावात सचिनचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
सांगलीत अनोख्या पध्दतीने साजरा झाला मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस…
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -