सांगली येथील शंभरफुटी रस्त्यावर हॉटेल एसएसमध्ये दारू पिण्यास व जेवणासाठी गेलेल्या टोळक्याने नंग्या तलवारी नाचवत व चाकूने दाखवत प्रचंड दहशत माजविली. बिअरच्या मोकळ्या बाटल्या टेबलावर फोडल्या. गार्डनचे पार्टीशन तोडले. काऊंटरवरील साहित्याची तोडफोड केली, याप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गणेश हात्तीकर, ओम पाटील, भारत आदमाने, विशाल ननवरे, ऋषिकेश कांबळे, समीर, रवि (पूर्ण नावे समजू शकली नाहीत) व अनोळखी चार संशयितांचा समावेश आहे. शंभरफुटी रस्त्यावर एका पेट्रोल पंपाजवळ हॉटेल एसएस आहे. संशयित या हॉटेलमध्ये दारू पिण्यास व जेवण करण्यासाठी गेले होते. दारू पिऊन व जेवण झाल्यानंतर अचानक त्यांच्यात वादावादी सुरू झाली. त्यातून त्यांच्यात दोन गट निर्माण झाले. ते जोरजोरात एकमेकांना शिवीगाळ करू लागले. घटनेनंतर संशयित आरोपी फरार आहेत, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
टोळीने तलवार व चाकूने माजविलेले दहशत पाहून हॉटेलमधील अन्य ग्राहक भितीने पळून गेले. हॉटेलमधील कामगारही घाबरले होते. ते एका कोपऱ्यात उभा राहून हा प्रकार पाहत होते. तासभर टोळीचा धिंगाणा सुरू होता. ते नेहमी या हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी जातात.
सांगलीत नंग्या तलवारी नाचवत दहशत; हॉटेलची तोडफोड, बिअरच्या बाटल्या फोडल्या ११ जणांविरूद्ध गुन्हा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -