Tuesday, August 26, 2025
Homeसांगलीसख्ख्या भावाकडून भावाचा खून! मालमत्तेच्या कारणावरून हत्येचा संशय

सख्ख्या भावाकडून भावाचा खून! मालमत्तेच्या कारणावरून हत्येचा संशय

कुपवाड जुना मिरज रोड येथे संत रोहिदासनगर महादेव मंदिर समोरील माऊली अपार्टमेंटमध्ये तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या डॉ. अनिल बाबाजी शिंदे (वय ४३, मुळगाव वडगाव सध्या. रा. कुपवाड ) यांचा सख्ख्या भावानेच खून केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या खूनाच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटना स्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मयत डॉ. अनिल शिंदे यांचा दवाखाना कुपवाड येथील हनुमान नगर येथे आहे. ते कुपवाड मिरज रोडवर असणाऱ्या अपार्टमेंट येथे तिसऱ्या मजल्यवरती राहण्यास होते. नेहमी प्रमाणे पूजा पठण करण्यात मग्न असताना त्यांचा लहान भाऊ संपत बाबाजी शिंदे (वय ३५, रा. शिवशक्तीनगर कुपवाड) याने पळत पळत येवून दाराला लाथा बुक्क्या मारून कडी तोडून आत प्रवेश केला. व मयत अनिल शिंदे यांच्यावर अचानक तोंडावर खुरप्याने सपासप सहा वार केले. वार इतके खोल होते की अनिल शिंदे हे जागीच मरण पावले.हा खून प्रॉपर्टीच्या वादातून झाल्याचे समजते. तसेच आरोपी हा मनोरुग्ण असल्याचे बोलले जात आहे. कुपवाड एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी खून प्रकरणातील संशयित आरोपीस काही वेळातच अटक केली. याप्रकरणी अधिक तपास कुपवाड पोलीस करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -