तासगाव आणि आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज (30 एप्रिल) मतदान सुरु झाले आहे. सायंकाळी चारपर्यंत मतदान प्रकिया पूर्ण करून लगेचच या दोन बाजार समितीची आजच मतमोजणी देखील होणार आहे. सांगली जिल्ह्यातीलतासगाव आणि आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज (30 एप्रिल) मतदान सुरु झाले आहे. सायंकाळी चारपर्यंत मतदान प्रकिया पूर्ण करुन लगेचच या दोन बाजार समितीची आजच मतमोजणी देखील होणार आहे. यामुळे आजच तासगाव आणि आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीवर कुणाची सत्ता येणार हे स्पष्ट होणार आहे. तासगाव बाजार समितीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. या ठिकाणी काँग्रेसचा एक गट भाजपसोबत गेला आहे आणि भाजप खासदार संजयकाका पाटील विरुद्ध स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या गटामध्ये या ठिकाणी निवडणूक होत आहे. खासदार संजयकाका पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार सुमनताई पाटील, सुरेश पाटील आणि रोहित पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीच्या निमित्ताने पणाला लागली आहे.
आटपाडी बाजार समितीसाठी भाजप आणि राष्ट्रवादीने हातमिळवणी केली आहे. त्यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांनी एकत्रित पॅनल उभे केले आहेत. माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार अनिल बाबर समर्थक तानाजी पाटील यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. दरम्यान काल (29 एप्रिल) सांगली, इस्लामपूर, विटा या तीन बाजार समित्यांची मतमोजणी पार पडली. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची वज्रमूठमुळे सत्ता आली. राष्ट्रवादी काँग्रेसने इस्लामपूरची बाजार समिती आपल्याकडे पुन्हा राखण्यात यश मिळवले. विटा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेना शिंदे गट, भाजप आणि काँग्रेस आघाडीच्या पॅनलने बाजी मारली.
सांगलीतील तासगाव आणि आटपाडी बाजार समित्यांसाठी मतदानास सुरुवात; आजच निकाल होणार जाहीर
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -