Wednesday, July 30, 2025
Homeराजकीय घडामोडीपवारांच्या पुस्तकात खळबळजनक गौप्यस्फोट!! शिवसेनेचे वर्चस्व संपवण्याचाच हिशोब ….

पवारांच्या पुस्तकात खळबळजनक गौप्यस्फोट!! शिवसेनेचे वर्चस्व संपवण्याचाच हिशोब ….

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्र्याचा दुसरा भाग 2 मे रोजी प्रकाशित होणार आहे . या दुसऱ्या भागामध्ये शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. 2019 नंतर शिवसेना आणि भाजप मधील अंतर कस वाढलं आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसला याचा फायदा कसा झाला हे पवारांनी आपल्या पुस्तकात सांगितलं आहे. शिवसेनेचे वर्चस्व संपवण्याचाच राजकीय हिशोब भाजपचा होता, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शिवसेनेबद्दल कोणताही स्नेहभाव नाही असं पवारांनी म्हंटल आहे. शिवसेनेला संपवल्याशिवाय भाजप वाढणार नाही. हाच हिशोब होता. स्वबळावर सत्ता मिळवून सेनेचं ओझ उतरवण्याचा भाजपचा चंग होता. नरेंद्र मोदी आणि अमित शाह याना शिवसेनेबद्दल कोणतीही सहानभूती नव्हती. विधानसभा निवडणुकीत यापूर्वी शिवेसना 171 आणि भाजप 117 जागा लढत असे. पण 2019 नंतर चित्रं बदललं. 2019मध्ये शिवसेनेने 124 जागा लढल्या. तर भाजपने 164 जागा पदरात पाडून घेतल्या. स्वत: च्या बळावर बहुमत मिळवत शिवसेनेचं ओझं उतरवून ठेवायचं असा चंग अतिआत्मविश्वासात दंग भाजपने बाळगला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -