Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडाMumbai Indians ला धक्का बसणार?

Mumbai Indians ला धक्का बसणार?

मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात एक नवीन गोलंदाज दाखल झालाय. त्यामुळे प्रमुख गोलंदाज सीजनमधून बाहेर गेल्याची भिती व्यक्त केली जातेय. ऑक्शनमध्ये या गोलंदाजाला कोणीही विकत घेतलं नव्हतं.
मुंबई इंडियन्सचा आयपीएल 2023 मध्ये आपला प्रवास कायम ठेवण्यासाठी संघर्ष सुरु आहे. याच दरम्यान टीममध्ये बरच काही घडतय. आता मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये इंग्लिश वेगवान गोलंदाज ख्रिस जॉर्डनची एंट्री झाल्याच वृत्त आहे. ख्रिस जॉर्डन ऑक्शनमध्ये अनसोल्ड होता. त्याची बेस प्राइस 2 कोटी रुपये होती. पण कुठल्याही फ्रेंचायजीने त्याला विकत घेण्यात रस दाखवला नाही.मीडिया रिपोर्ट्सनुसार ख्रिस जॉर्डन रिप्लेसमेंट प्लेयर म्हणून मुंबई इंडियन्सशी जोडला गेलाय. ख्रिस जॉर्डन कोणाच्या जागी टीममध्ये आलाय? त्या बद्दल अजून खुलासा झालेला नाही. आता इंग्लंडचा धोकादायक गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर जाणार का? असा प्रश्न विचारला जातोय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -