Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडारोहित शर्माला बर्थडे गिफ्ट! मुंबईचा राजस्थानवर सहा विकेटने विजय

रोहित शर्माला बर्थडे गिफ्ट! मुंबईचा राजस्थानवर सहा विकेटने विजय

सुर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि टीम डेविडच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने राजस्थानचा सहा विकेटने पराभव केला. राजस्थानने दिलेल्या 212 धावांचे आव्हान मुंबईने तीन चेंडूत आणि सहा विकेट राखून यशस्वी पार केले. राजस्थानचा पराभव करत मुंबईने रोहित शर्मा याला वाढदिवसाचे गिफ्ट दिले. यशस्वी जयस्वाल याची शतकी खेळी व्यर्थ गेली. सुर्यकुमार यादव याने 55 धावांची खेळी केली. तर टीम डेविड याने अखेरीस 14 चेंडूत 45 धावांचा पाऊस पाडला. 

राजस्थानने दिलेल्या 213 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा अवघ्या तीन धावांवर बाद झाला. त्यानंतर ईशान किशन आणि कॅमरुन ग्रीन यांनी मुंबईचा डाव सावरला. पण दोघांनीही एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या.  ईशान किशन याने 28 धावांची खेळी केली. तर कॅमरुन ग्रीन याने याने 44 धावांचे योगदान दिले. या दोघांना आर. अश्विन याने तंबूत धाडले. ग्रीन याने दोन षटकार आणि चार चौकार लगावले. 

सूर्यकुमार यादव याने मुंबईचा डाव सावरला. सुर्यकमार यादव याने झटपट धावा जमवल्या. सुर्यकुमार आणि तिलक वर्मा यांनी मुंबईच्या डावाला आकार दिला. सुर्यकुमार यादव याने 29 चेंडूत 55 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने आठ चौकार आणि दोन षटकार लगावले. सुर्यकुमार यादव मुंबईला सहज विजय मिळून देईल असे वाटत होते.. पण बोल्टच्या गोलंदाजीवर संदीप शर्मा याने जबरदस्त झेल घेतला. सुर्यकुमार बाद झाल्यानंतर टीम डेविड आणि तिलक वर्मा यांनी मुंबईला विजय मिळवून दिला.

तिलक वर्मा याने नाबाद 29 धावांची खेळी केली. तर टीम डेविड याने 14 चेंडूत 45 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये डेविड याने पाच षटकार लगावले. राजस्थानकडून आर अश्विनयाने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. तर संदीप शर्मा आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.

दरम्यान, यशस्वी जायस्वाल याच्या झंझावाती शतकाच्या बळावर राजस्थानने 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 212 धावांपर्यंत मजल मारली. यशस्वी जायस्वाल याने 124 धावांची शतकी खेळी केली. यंदाच्या आयपीएलमधील हे तिसरे शतक होय.. तर मुंबईविरोधात दुसरे शतक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -