आज आयपीएल मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन संघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे. लखनौच्या घरच्या मैदानावर आजचा सामना रंगणार आहे. ईकाना स्टेडिअमवर संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. आयपीएल गुणतालिकेत लखनौ संघ सध्या दुसऱ्या स्थानावर तर बंगळुरु सहाव्या स्थानावर आहे. यंदाच्य आयपीएलच्या सोळाव्या हंगाातील हा 43 वा सामना असेल. आयपीएल 2023 मधील 15 व्या सामन्यात बंगळुरुला लखनौ संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता, या पराभवाचा वचपा काढण्यासाठी बंगळुरु संघ तयार झाला आहे. लखनौ आणि बंगळुरुमध्ये लढत
लखनौ संघाने मागील सामन्यात पंजाब किंग्सवर विजय मिळवला. तर दुसरीकडे बंगळुरु संघाला मागील सामन्यात कोलकाताकडून पराभवाचा सामना करावा लागला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल. तर लखनौ सुपर जायंट्स संघ विजयी मोहित कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरेल. लखनौ संघाने आतापर्यंत आठ पैकी पाच सामने जिंकले आहेत. तर आरसीबी संघाने आठपैकी चार सामने जिंकले आहेत.
LSG vs RCB,
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -