Friday, February 7, 2025
Homeक्रीडाबंगळुरूकडून लखनौचा 18 धावांनी पराभव, आयपीएल पॉईंट्स टेबलची स्थिती काय पाहा.

बंगळुरूकडून लखनौचा 18 धावांनी पराभव, आयपीएल पॉईंट्स टेबलची स्थिती काय पाहा.

आयपीएल 2023 च्या लीगच्या 43 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सचा 18 धावांनी पराभव केला. पाहा आयपीएल पॉईंट्स टेबलची स्थिती काय आहे लखनौ सुपर जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने विजय मिळवला. लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर आरसीबीने 9 गडी गमावून 126 धावा केल्या. प्रत्युत्तरात केएल राहुलचा संघ 19.5 षटकांत 108 धावांवर गारद झाला. बंगळुरूने लखनौवर 18 धावांनी विजय मिळवला. आरसीबीच्या विजयानंतर आयपीएल गुणतालिकेत बदल झाला आहे. आरसीबीकडे आता 10 गुण असून संघ सहाव्या स्थानावर आहे. बंगळुरुने नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकले आहेत. पराभवानंतर लखनौ संघाकडेही दहा गुण आहे. या सामन्यानंतर जर आपण आयपीएल 2023 च्या पॉईंट्स टेबलमध्ये सध्या आरसीबी सहाव्या स्थानावरून पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र, टॉप 4 मध्ये जाण्यासाठी त्याला आणखी सामने जिंकावे लागतील. तर, लखनौ सुपर जायंट्स पराभवानंतर दुसऱ्या क्रमांकावरून तिसर्‍या क्रमांकावर गेला आहे. त्यामुळे राजस्थान रॉयल्सला फायदा झाला असून संघ उडी घेत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. राजस्थान रॉयल्सकडे 10 गुण आहेत. या संघाने 9 सामन्यांपैकी 5 सामने जिंकले आहेत, तर 4 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.या विजयासह आरसीबी संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी पाचव्या स्थानावर असलेल्या पंजाब एक स्थान खाली घसरून आता सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पंजाब संघाने नऊ सामन्यांपैकी पाच सामने जिंकल्यानंतर पंजाबकडे 10 गुण आहेत. मुंबई संघ सातव्या क्रमांकावर आहे. मुंबईने आठपैकी चार सामने जिंकले असून संघाकडे आठ गुण आहेत. कोलकाता संघ आठव्या स्थानावर असून संघाकडे सहा गुण आहेत. कोलकाता संघाने नऊ सामन्यांपैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. यानंतर हैदराबाद संघ आठव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर घसरला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ दहाव्या क्रमांकावर आहे. हैदराबाद संघाकडे सहा तर दिल्ली संघाकडे चार गुण आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -