Friday, February 7, 2025
Homeक्रीडाRCB vs LSG : कोहली आणि गंभीर यांच्याविरुद्ध कोणत्या नियमांतर्गत कारवाई?

RCB vs LSG : कोहली आणि गंभीर यांच्याविरुद्ध कोणत्या नियमांतर्गत कारवाई?

आयपीएल स्पर्धा आता रंगतदार वळणावर आली असताना विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वाद चर्चेचा ठरला आहे. सामन्यानंतर झालेली बाचाबाचीने सर्वांचं लक्ष वेधलं. आयपीएल 2023 मधील ही सर्वात मोठी घडामोड ठरली आहे. नेमकं काय झालं असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. त्याचबरोबर काही आजी माजी खेळाडूंनी खडे बोलही सुनावले आहे. असं सगळं सुरु असताना बीसीसीआयचे आयपीएलच्या नियमावलीनुसार विराट आणि गंभीर विरोधात कारवाई केली आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या सामना फी मधून 100 टक्के दंड ठोठावला आहे.
विराट कोहली पुन्हा एकदा चर्चेत आहे. यावेळी चर्चेच कारण त्याची फलंदाजी नाही, तर वाद आहे. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध RCB ने मिळवलेल्या विजयानंतर विराट कोहली चर्चेत आहे. विराट कोहली या मॅचमध्ये LSG चा नवीन उल हक आणि गौतम गंभीरला भिडला. परिस्थिती इथपर्यंत आली की, अन्य़ खेळाडूंनी विराट आणि गंभीरला वेगळं केलं. दोघांवर कारवाई करण्यात आली असून 100 टक्के मॅच फी कापण्यात आली आहे. हरभजन सिंगने या मुद्यावर एक विधान केलय. हरभजन सिंग म्हणाला की, अशाच एका भांडणामुळे मला आजही लाज वाटते.हरभजन सिंह आपल्या युट्यूब चॅनलवर म्हणाला की, विराट कोहली आणि गौतम गंभीरमध्ये जे काही झालं, ते क्रिकेटसाठी चांगलं नाहीय. 2008 साली हरभजन सिंग सुद्धा अशाच एका वादात अडकला होता. त्याने भांडण केलं होतं. ज्याची आजही हरभजनला लाज वाटते. हरभजनने त्यावेळी मॅचनंतर श्रीसंतच्या कानाखाली मारली होती. श्रीसंतला मैदानातच रडू कोसळलं होतं. हरभजन सिंगला त्या सीजनमध्ये टुर्नामेंटमधून बाहेर करण्यात आलं होत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -