Friday, February 7, 2025
Homeनोकरीसरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या एसबीआय, बिहार विधानसभा, गुजरात हायकोर्ट, भारतीय लष्कर व अणुऊर्जा विभागात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदांवर निवड झाल्यानंतर तुम्हाला दरमहा 50 हजारांपासून ते थेट 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकेल.


सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आज आम्ही विविध विभागात सुरू असलेल्या भरतीची माहिती देत आहोत. ही नोकरी लागल्यानंतर तब्बल 50 हजारांपेक्षा जास्त पगार सहज मिळेल. चला तर, या भरती प्रक्रियेबाबत जाणून घेऊ.

बिहार विधानसभेत सुरक्षारक्षक पदाची भरती

बिहार विधानसभेत 69 सुरक्षारक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातेय. या भरती प्रक्रियेत बारावी उत्तीर्ण झालेले 18 ते 25 वर्ष वयोगटातील उमेदवार सहभागी होऊ शकतात. भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 असून उमेदवाराची निवड ही ऑनलाइन/ऑफलाइन परीक्षा, शारीरिक चाचणीद्वारे केली जाईल. खुल्या व ओबीसी प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क 170 रुपये तर एससी आणि एसटी प्रवर्गासाठी 20 रुपये आहे. विधानसभेत सुरक्षारक्षक पदावर निवड झाल्यास 21,700 ते 69,100 रुपयांपर्यंत पगार मिळेल. या भरतीची अधिक माहिती www.vidhansabha.bih.nic.in या वेबसाइटवर मिळेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -