Monday, July 28, 2025
Homeराजकीय घडामोडीशरद पवार यांचा राजकारणातील मोठा निर्णय, अध्यक्षपदावरुन निवृत्तीचा घेतला निर्णय

शरद पवार यांचा राजकारणातील मोठा निर्णय, अध्यक्षपदावरुन निवृत्तीचा घेतला निर्णय

गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता या पदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मी घेतला आहे, असे शरद पवार यांनी जाहीर केले. यावेळी कार्यकर्त्यांनी अध्यक्षपद पवार साहेबांनी सोडू नये, असा आग्रह धरत घोषणाबाजी केली.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी झाले. या पुस्तकातून शरद पवार यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडेल, असे हे धक्कादायक खुलासे आहेत. या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवार यांनी अनेक आठवणी सांगितल्या. त्याचवेळी धक्कादायक निर्णय जाहीर केला. आपण अध्यक्षपदावरुन निवृत्त होत असल्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यावेळी प्रतिभा पवार सुद्धा भावूक झाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -