घाबरलेल्या सौंदयाने अगदी घट्ट मारलेली मिठी आणि पाण्यात पुतणीला वाचवण्यासाठी सतत पोहावे लागले असल्याने आलेल्या थकव्यामुळे मनोज यांचाही यात दुर्दैवाने मृत्यू झालाविहिरीत पडलेल्या आपल्या पुतणीला वाचविण्यास गेलेल्या काकाला पुतणीने पाण्यामध्ये घट्ट मिठी मारल्याने काका-पुतणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कवठेमहांकाळ तालुक्यातील अग्रण धुळगाव गावात घडली आहे. मनोज भास्कर शेसवरे (वय 43) आणि सौंदर्या वैभव शेसवरे अशी मृतांची नावे आहेत. कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. काका-पुतणीच्या मृत्यूनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली.
अग्रण धुळगाव येथील शेसवरे मळा येथे राहत असलेली सौंदर्या आणि तिची आई घराच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. पाणी आणण्यासाठी माय-लेकी दोघीही विहिरीत उतरल्या. विहिरीत उतरलेल्या सौंदर्याने कळशीत पाणी भरले आणि वर येत असतानाच अचानक पाय घसरला आणि ती विहिरीत पडली. काही समजण्याच्या आतच ती विहिरीत पडल्याने सौंदर्याच्या आईने आरडाओरडा करत मुलीला वाचवण्यासाठी हाका देऊ लागल्या. हा आरडाओरडा एकूण जवळच असलेले सौंदर्याचे चुलते मनोज शेसवरे हे विहिरीकडेला धावत आले. सौंदर्या विहिरीत पडलेली पाहून त्यांनी तिला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली आणि तिला पाण्याबाहेर काढले. सौंदर्याला उचलून पाण्याबाहेर घेऊन येत असताना मनोज यांचा पाय घसरला आणि दोघेही पुन्हा पाण्यात पडले. घाबरलेल्या सौंदर्याने मनोज यांना पाण्यामध्ये घट्ट मिठी मारली. यामुळे मनोज यांना हातपाय हलवता आले नाहीत.
काकानं जीवाचं रान केलं, पण… पुतणीला वाचवण्याच्या नादात काकाचाही विहिरीत बुडून मृत्यू
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -