Tuesday, July 29, 2025
Homeराजकीय घडामोडीराष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा, शरद पवार यांना ‘तो’...

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा, शरद पवार यांना ‘तो’ अधिकार नाहीच म्हणत आव्हाड स्पष्टच बोलले

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा शरद पवार यांनी मागे घ्यावा अशी मागणी करत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कार्यकर्त्यांनी मोठा निर्णय घेत मागणी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी घेतलेला राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मागणी करत आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केली आहेत. राज्यातील बहुतांश ठिकाणी अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू करत शरद पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे अशी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना आपल्या निर्णयाच्या संदर्भात माघार घेण्यासाठी रेटा लावून धरला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे.

याच दरम्यान शरद पवार हे राजीनामावर ठाम असल्याचाही बोलले जात आहे. त्यामुळे शरद पवार यांनी राजीनामा द्यावा यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून दबाव तंत्राचा वापर केला जात आहे.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अनेक पदाधिकाऱ्यांसह राजीनामा दिला आहे त्यामुळे एकूणच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून राजीनामा अस्र काढण्यात आले असून शरद पवार यांच्या राजीनामाच्या संदर्भात पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक होताना बघायला मिळत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -