आई हे आपले सर्वस्व असते, मायेचे दुसरे रूप म्हणजे आई ! पण कलकत्ता येथे एका आईने आपल्याच मुलीचे आयुष्य स्वत:च्याच हाताने संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी ! असं म्हणतात. पण नुकतीच एक अशी घटना समोर आली आहे, जी वाचून तुम्हीही म्हणाल, माता तू न वैरिणी…! विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलीचे आयुष्य तिच्या आईनेच संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेवर तिच्या पोलीस प्रियकरासोबत कट रचून, तिच्या सोळा वर्षांच्या मुलीला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. याप्रकरणी हरिदेवपूर पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. कलकत्त्यामधील हरिदेवपूर येथील मोतीलाल गुप्ता रोड परिसरात ही खळबळजनक घटना घडली.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -