राजाराम कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार अमल महाडिक प्रबळ दावेदार असले, तरी महादेवराव महाडिकांचे आजवरचे धक्कातंत्र पाहता म्हणून नव्या चेहऱ्याला संधी देणार का? याचीही चर्चा आहे.नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूरमधील कसबा बावड्यातील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची निवडणूक 9 मे रोजी होत आहे. निवडणूक पार पडल्यानंतर संचालक मंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. यासाठी नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता कारखान्याची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राजाराम कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार अमल महाडिक प्रबळ दावेदार असले, तरी महादेवराव महाडिकांचे आजवरचे धक्कातंत्र पाहता म्हणून नव्या चेहऱ्याला संधी देणार का? याचीही चर्चा आहे. नव्या संचालक मंडळामध्ये 14 नवीन चेहरे निवडून आले आहेत. अध्यक्षपदासाठी दिलीप पाटील तसेच शिवाजी पाटीलही नावे चर्चेत येऊ शकतात. निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 9 मे रोजी सकाळी दहा वाजता करे यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक होईल. याच बैठकीत अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची संधी कोणाला मिळणार? यावर शिक्कामोर्तब केलं जाईल.
राजाराम साखर कारखाना अध्यक्ष निवडीसाठी मुहूर्त ठरला; अमल महाडिकांसह ‘या’ नावांचीसुद्धा चर्चा
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -