Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगगौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडिओ शेयर करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात, व्हिडिओ काढण्यामागील कारण...

गौतमी पाटीलचा ‘तो’ व्हिडिओ शेयर करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात, व्हिडिओ काढण्यामागील कारण काय?

संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या अदांनी वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक व्हिडिओ शेयर करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे.संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असलेली नृत्यांगना गौतमी पाटील हिचा काही दिवसांपूर्वी एक कपडे बदलतांनाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर सोशल मिडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. त्यानंतर पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिस संशयित आरोपीचा शोध घेत होते. त्यात पोलिसांना यश आले असून एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे. त्याच्या आई वडिलांना देखील पोलिसांनी चौकशी करिता बोलावले आहे. याच प्रकरणाची राज्य महिला आयोगाने देखील दखल घेतली होती. या तरुणासोबत आणखी एक व्यक्ती होती. सोशल मिडियावर व्हायरल करण्याच्या उद्देशाने यांनी हा प्रताप केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.सबसे कातील असं म्हंटल तर गौतमी पाटील असं नाव आपसूकच घेतलं जातं. त्याचं कारण म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईला गौतमी पाटील हिने वेड लावलं आहे. अनेक तरुण गौतमी पाटील हिच्या अदा पाहण्यासाठी मोठी गर्दी करत असतात.

गौतमी पाटील हीचे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चाहते आहे. रील्स स्टार म्हणून गौतमी पाटील सर्वांना परिचित आहे. त्यामुळे गौतमी पाटील हीअशी सर्व परिस्थिती असतांना पुण्यात एका कार्यक्रमाच्या दरम्यान गौतमी पाटील कपडे बदलत असतांनाचा एक व्हिडिओ शेयर करत असतानाचा व्हिडिओ शेयर करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संताप निर्माण केला जात होता. सर्वांना परिचित असल्याने तिच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होत असते. त्यामध्ये महत्वाची बाब म्हणजे अनेक कार्यक्रमांना गोंधळ होत असतो.संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. कपडे बदलतानाचा तिचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याचा किळसवाणा प्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

व्हिडिओ कोणी काढला याचा शोध पोलिसांनी सुरु केला असता अखेर अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यातून एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आलं आहे. तो अल्पवयीन असल्याने त्याच्या आई वडिलांना पोलिस ठाण्यात बोलावण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -