Monday, July 28, 2025
Homeसांगली१३१ कोटींच्या कर्जांना जिल्हा बँकेकडून मंजुरी

१३१ कोटींच्या कर्जांना जिल्हा बँकेकडून मंजुरी

जिल्हा मध्यवर्ती बँकेने शनिवारी शेती, बिगरशेतीच्या १३१ कोटी १५ लाख रुपयांच्या कर्जप्रकरणांना कार्यकारी समितीच्या बैठकीत मंजुरी आल्याची माहिती अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी आज दिली. यामध्ये जिल्ह्यातील चार कारखान्यांच्या १०५ कोटी रुपयांचा समावेश आहे.जिल्हा बँकेच्या राजारामबापू पाटील सभागृहात आमदार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. साखर कारखान्यांचा हंगाम संपला असला, तरी पूर्वतयारी हंगामासाठी चार कारखान्यांनी कर्जाची मागणी केली होती, त्यानुसार चार कारखान्यांना १०५ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले.बिगरशेती’मध्ये रिटेल फायनान्स थेट कर्ज पुरवठ्यांतर्गत ४ लाख, ६ पगारदार सभासदांना ५० लाख ५० हजार, शेतकरी घरबांधणीअंतर्गत ९ सभासदांना ८९ लाख, वाहन खरेदीसाठी २ सभासदांना १ लाख ८० हजार, बँक सेवक घरबांधणी १३ लाख ५० हजार, दोन शैक्षणिक कर्ज ५९ लाख, याशिवाय अन्य ‘बिगरशेती’च्या प्रकारणांसह २५ कोटी १० लाख रुपयांच्या प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.शेती कर्जअंतर्गत विकास सोसायटीस विविध कारणांसाठी ५७ सभासदांना १ कोटी ५ लाख ५५ हजार रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -