Wednesday, July 30, 2025
Homeक्रीडाछोट्या भावासमोर मोठ्या भावाची हार, गुजरातच प्लेऑफच्या दिशेने भक्कम पाऊल

छोट्या भावासमोर मोठ्या भावाची हार, गुजरातच प्लेऑफच्या दिशेने भक्कम पाऊल

गुजरात टायटन्सने लखनौ सुपर जायंटसवर  शानदार विजय मिळवला आहे. फलंदाजीला अनुकूल असलेल्या विकेटवर लखनौचा कॅप्टन क्रृणाल पंड्याने टॉस जिंकून गुजरातला पहिली बॅटिंग दिली. गुजरातचे ओपनर ऋदिमान साहा आणि शुभमन गिल यांनी टीमला स्फोटक सुरुवात दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी तब्बल 142 धावांची भागीदारी केली. आधी साहाने लखनौच्या बॉल्रर्सचा समाचार घेतला. त्यानंतर शुभमन गिलने धुतलं.

ऋदिमान साहाने 43 चेंडूत 81 धावा फटकावल्या. त्याने 10 फोर आणि 4 सिक्स मारले. दुसरा ओपनर शुभमन गिलने 51 चेंडूत नाबाद 94 धावा केल्या. त्याने 2 फोर आणि 7 सिक्स मारले. दोघांनी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फोर-सिक्सचा पाऊस पाडला.

साहा आऊट झाल्यानंतर शुभमन गिलने सूत्र आपल्या हाती घेतली. कॅप्टन हार्दिक पंड्याने 15 चेंडूत 25 आणि डेविड मिलरने 12 चेंडूत नाबाद 21 धावा चोपल्या. गुजरातने 20 ओव्हर्समध्ये 227 धावांचा डोंगर उभारला.

गुजरातच्या या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सने दमदार सुरुवात केली होती. काइल मेयर्स आणि क्विंटन डिकॉक या दोन्ही ओपनर्सनी गुजरातच्या बॉलर्सचा सुद्धा तसाच समाचार घेतला. 10 ओव्हर्समध्ये लखनौच शतक धावफलकावर लावलं. आक्रमक बॅटिगं करणाऱ्या मेयर्सला मोहित शर्माने राशिद खानकरवी 48 धावांवर झेलबाद केलं. त्याने 32 चेंडूत 48 धावा करताना 7 फोर आणि 2 सिक्स मारले.


त्यानंतर दीपक हुड्डा (11), मार्कस स्टॉयनिस (4) आणि निकोलस पूरन (3) धावांवर आऊट झाले. धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात हे तिन्ही विकेट गेले. आयुष बदोनीने अखेरीस फटकेबाजी केली. पण तो पर्यंत उशिर झाला होता. बदोनीने 11 चेंडूत 21 धावा केल्या. मोक्याच्याक्षणी राशिद खानने क्विटंन डिकॉकला बोल्ड केलं. त्याने 41 चेंडूत 70 धावा चोपल्या. लखनौच्या टीमने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 7 बाद 171 धावा केल्या.

गुजरातने 56 धावांनी हा सामना जिंकला. गुजरातकडून मोहित शर्माने जबरदस्त बॉलिंग केली. त्याने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 4 विकेट काढल्या. अन्य गोलंदाज मार खात असताना मोहित शर्माने विकेट टेकिंग बॉलिंग केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -