Thursday, July 31, 2025
Homeसांगलीसांगलीत तलवारीचा धाक दाखवून युवकास लुटले

सांगलीत तलवारीचा धाक दाखवून युवकास लुटले

शहरातील अतिशय वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा एका युवकाला बेदम मारहाण करत चाकू आणि तलवारीचा धाक दाखवून अज्ञात दोघांनी लुटल्याची घटना घडली. दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी धनराज आनंदा पोळ (वय २२ रा. प्रशिक चौक, सांगली) याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोघांनी धनराज याच्या जवळील ७०० रुपये काढून घेत
पलायन केले.

धनराज पोळ हा आपल्या कुटुंबियांसह हरिपूर रोडवरील प्रशिक चौक येथे राहतो. दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास कॉलेज कॉर्नर परिसरातील राजमाता प्लाझा येथे थांबला होता. यावेळी अज्ञात दोघेजण अचानक समोर आले. त्यांनी त्यांच्या जवळ असलेला चाकू आणि तलवारीचा धाक दाखवून शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी धनराज याच्या खिशात असणारे ७०० रुपये काढून घेत दोघांनी पलायन केले.

घडलेल्या या घटनेनंतर धनराज याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसऱ्या दिवशी फिर्याद दिली. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कॉलेज कॉर्नर परिसरात फळकुटदादांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. चौकात युवकांची टोळकी उभी असतात. त्यातच आता भरदिवसा लुटमारीच्या घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -