राज्यात गेल्या काही दिवसांपासून नवीन जिल्हा निर्मिती बाबत मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. राज्यातील आकारमानाने मोठे असलेले आणि लोकसंख्येने मोठे असलेले जिल्हे विभाजित करून नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार झाला असल्याचे अनेक मीडिया रिपोर्ट मधून समोर आले आहे.
खरं पाहता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील नवीन जिल्हा निर्मिती बाबत गेल्या काही दिवसांपूर्वी एक मोठ अपडेट दिल होतं. शिंदे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाईल असे मत व्यक्त केलं होतं.
यामुळे मीडिया रिपोर्ट मध्ये सध्या महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होईल असं सांगितलं जात आहे. दरम्यान आज आपण राज्यात कोणत्या नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होऊ शकते आणि याबाबत महसूल विभागाने काय म्हटले आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कोणत्या नवीन 22 जिल्ह्यांची निर्मिती होणार
अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून शिर्डी श्रीरामपूर आणि संगमनेर या तीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे.
नाशिक जिल्ह्यातून मालेगाव आणि कळवण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करणे प्रस्तावित आहे.
ठाणे जिल्ह्यातून मीरा-भाईंदर आणि कल्याण या दोन जिल्ह्यांची निर्मिती करणे प्रस्तावित आहे.
पालघर जिल्ह्यातून जव्हार या जिल्ह्याची निर्मिती करणे प्रस्तावित आहे.
रायगड जिल्ह्यातून महाड हा नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.
पुणे जिल्हा विभाजित करून शिवनेरी हा नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.
सातारा जिल्ह्यातून माणदेश नवीन जिल्हा तयार होणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून मंडणगड नवीन जिल्हा तयार करणे विचाराधीन आहे.
बीड जिल्ह्यातून आंबेजोगाई हा नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.
लातूर मधून उदगीर जिल्हा बनवणे प्रस्तावित आहे.
नांदेड मधून किनवट जिल्हा बनवणे प्रस्तावित आहे.
जळगाव जिल्ह्यातून भुसावळ जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून खामगाव जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.
अमरावती जिल्ह्यातून अचलपूर जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.
यवतमाळ जिल्ह्यातून पुसद जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
भंडारा जिल्ह्यातून साकोली जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून चिमुर जिल्हा तयार करण्याचे नियोजन आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे विभाजन करून आहेरी हा नवीन जिल्हा तयार करणे प्रस्तावित आहे.