Monday, July 28, 2025
Homeतंत्रज्ञानगुगलचा नवीन नियम ! Gmail सुरू ठेवण्यासाठी द्यावे लागतील पैसे

गुगलचा नवीन नियम ! Gmail सुरू ठेवण्यासाठी द्यावे लागतील पैसे

स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करणाऱ्या प्रत्येकाकडे जीमेल असते. जीमेल असणे हे आजच्या काळाची गरज आहे. आतापर्यंत जीमेल सर्विस पूर्णपणे फ्री मिळत होती. परंतु, आता ही फ्री सर्विस बंद होऊ शकते. गुगल आगामी काळात जीमेल सर्विसला पेड करू शकते. जर असे झाले तर तुम्हाला पैसे द्यावे लागू शकतात. गूगल ने Gmail वर जाहिरात दाखवायला सुरुवात केली आहे.
रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, पुढे भविष्यात जीमेलवरील जाहिरातीची संख्या वाढणार आहे. कंपनी आता यूट्यूबच्या पावलावर पाऊल ठेवणार आहे. कंपनी जाहिरात दाखवून पैसे कमावण्याचा प्लान बनवत आहे. यूट्यूब मध्ये जर जाहिरात पाहायची नसेल तर तुम्हाला मंथली सब्सक्रिप्शन प्लान घ्यावा लागतो.

गुगलने जीमेल मध्ये जाहिरातीला ईमेल लिस्ट दरम्यान अॅड केले आहे. यामुळे यूजर्सला मेल चेक करण्यात मोठी अडचण येत आहे. अनेक जीमेल यूजर्सने यावरून गुगलकडे तक्रार सुद्धा केली आहे. यूजर्सकडून लागोपाठ कंपनीच्या जाहिरातीच्या या निर्णयावर टिका केली जात आहे. यूजर्सच्या म्हणण्यानुसार, जाहिरातीमुळे मेल्सला नेव्हिगेट करण्यात अडचण येत आहे.

रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, गुगल गेल्या आठवड्यापासून जीमेल मोबाइल आणि वेब दोन्ही व्हर्जनवर गेल्या आठवड्यापासून जाहिरात दाखवत आहे. जीमेल मध्ये आधीही जाहिराती येत होत्या. परंतु, हे मेल्सच्या टॉपवर येत होत्या. परंतु, आता जाहिराताली मेलच्या लिस्ट दरम्यान अॅड केले जात आहे. आतापर्यंत कंपनीकडून जीमेलला पेज करण्यावरून कोणत्याही प्रकारचे संकेत देण्यात आले नाही. परंतु, यूजर्सच्या म्हणण्यानुसार, जर कंपनी जाहिरात दाखवत आहे तर भविष्यात या प्लॅटफॉर्मला पेड केले जाऊ शकते. कंपनी जाहिरातीला हटवण्यासाठी मंथली सब्सक्रिप्शन मॉडल लागू करू शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -