Tuesday, July 29, 2025
HomeसांगलीSangli: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सहा वर्षाच्या मुलाला आईनेच फेकलं विहिरीत!

Sangli: अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या सहा वर्षाच्या मुलाला आईनेच फेकलं विहिरीत!

एका आईने प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या सहा वर्षाच्या मुलाचा निर्दयीपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अनैतिक संबंध आणि लग्नात अडसर ठरत असल्याने मुलाला विहिरीत फेकून हा खून करण्यात आला आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातील लेंगरेमध्ये हा प्रकार घडला आहे.

खानापूरच्या लेंगरे या ठिकाणी राहणाऱ्या ज्योती प्रकाश लोंढे (वय २८) या विवाहित महिलेने आपल्या पोटच्या सहा वर्षांच्या मुलाचा प्रियकराच्या मदतीने निर्दयीपणे खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शौर्य प्रकाश लोंढे या सहा वर्षांच्या मुलाचा विहिरीत फेकून देऊन खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विटा पोलिसांनी ज्योती प्रकाश लोंढे आणि तिचा प्रियकर रूपेश नामदेव घाडगे (वय २५) या दोघांना अटक केली आहे.

लेंगरे या ठिकाणी राहणाऱ्या ज्योती प्रकाश लोंढे या विवाहित महिलेचा रुपेश नामदेव घाडगे या तरुणासोबत प्रेम संबंध जुळले होते. या दोघांनाही त्यांच्या अनैतिक संबंधात आणि लग्नासाठी शौर्य हा अडसर ठरत होता. त्यामुळे दोघांनी मिळून शौर्य याचा काटा काढण्याचा प्लॅन आखला. त्यानुसार, शौर्य याला गावातल्याच एका विहिरीमध्ये फेकून दिले. ज्यामध्ये शौर्य याचा बुडून मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आई ज्योती लोंढेने विटा पोलिस ठाण्यामध्ये धाव घेत शौर्यचे अपहरण झाल्याची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर गावातील विहिरीमध्ये शौर्य याचा मृतदेह आढळून आला होता. यानंतर पोलिसांनी तपास केला असता, यामध्ये ज्योती लोंढे आणि रुपेश घाडगे या दोघांचेही अनैतिक सबंध समोर आले. यानंतर दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता, दोघांनीही शौर्यच्या खुनाची कबुली दिली असून दोघांनाही विटा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास विटा पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -