मित्रांनो, आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थांचे भक्त आहेत सेवेकरी आहेत. आपण अगदी मनोभावे आणि श्रद्धेने स्वामींची सेवा, मंत्रांचा जप हे करतच असतो. अनेक जण हे मठामध्ये, केंद्रामध्ये जाऊन स्वामींची सेवा करण्यात लीन होऊन जातात. परंतु काही जणांना वेळी अभावी ते घरातच स्वामींची पूजा अर्चना करतात. तसेच अनेक मंत्रांचा जप देखील करीत असतात. मित्रांनो स्वामी हे प्रत्येक भक्तांच्या पाठीशी उभे राहतात भक्ताला प्रत्येक संकटातून बाहेर देखील स्वामी काढत असतात.
तर आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की स्वामींची नित्यसेवा कशी करावी? आणि ही नित्यसेवा लगेचच फळ देणारी असावी. तर आज मी अशीच एक तुम्हाला स्वामींची लगेचच फळ देणारी नित्यसेवा सांगणार आहे. यामध्ये तुम्ही ही सेवा केला तर स्वामींचा अनुभव तुम्हाला नक्कीच येईल. स्वामींचा कृपाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. तर या सेवेमध्ये नैवेद्यापासून स्वामींच्या पूजेपर्यंत सर्व माहिती मी सांगणार आहे.
तर तुम्ही आपल्या घरामध्ये जर स्वामींची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही मूर्ती किंवा फोटो गुरुवारच्या दिवशी खरेदी करून आणायचा आहे. ही मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर तुम्ही घरात आल्यानंतर त्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे. म्हणजेच साडेदहा वाजण्याच्या आत मध्ये तुम्हाला स्वामींची मूर्ती खरेदी करून त्याचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरांमध्ये अगदी मधोमध ते स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवायचा आहे.
नंतर तुम्ही व्यवस्थित पूजा अर्चना करून घेऊन झाल्यानंतर तुम्ही स्वामी समर्थांना साडेदहाच्या अगोदर नैवेद्य दाखवायचा आहे. यामध्ये तुम्ही स्वामींना दूध साखरेचा नैवेद्य म्हणजेच एका वाटीमध्ये दूध घेऊन त्यामध्ये थोडीशी साखर घालून तो नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे. तसेच मित्रांनो तुम्हाला दररोज स्वामींच्या मंत्राचा जप करायचा आहे. म्हणजेच श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला 11 माळी जप करायचा आहे.
हा जप तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळ देखील करू शकता. परंतु जर अनेकांना वेळेअभावी ही शक्य नसते तर अशा लोकांनी एक माळ जरी स्वामींचा जप केला तरीही चालतो. तसेच तुम्ही वीस मिनिटे देखील लावून स्वामींचा मंत्र जप करू शकता. तसेच स्वामींचे सारामृत देखील तुम्हाला वाचायचे आहे. तुमच्या वेळेनुसार म्हणजेच तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही स्वामींचे सारामृत वाचण्यास सुरुवात करायची आहे.
तसेच संध्याकाळी देखील स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. जर तुम्ही नैवेद्य म्हणजेच घरामध्ये स्वयंपाक केला नसेल तर संध्याकाळच्या वेळेस थोडासा भात तुम्ही करून दूध भाताचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे किंवा तुम्ही पोहे देखील स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवू शकता. सकाळी तुम्ही साडेदहापर्यंत स्वामींना नैवेद्य दाखवू शकता. बरेच जण हे आपल्यापैकी बारापर्यंत नैवेद्य दाखवत असतात परंतु ही चुकीची वेळ आहे. तर तुम्ही साडेदहापर्यंत स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे.
या नैवेद्यावरती तुम्ही तुळशीचे पान आवश्य ठेवायचे आहे. तसेच आपल्यापैकी बरेच जण हे कामाला जात असल्यामुळे आपण घरामध्ये जेवण करतो. त्यावेळेस तुम्ही स्वामींना अजून नैवेद्य दाखवायचा असाल तर त्यावेळेस जेवण बनवल्यानंतर लगेचच स्वामींच्या नैवेद्याचे ताट बाजूला काढून मगच दुसऱ्या व्यक्तींना खाण्यास द्यायचे आहे.
परंतु साडेदहाच्या आतमध्ये तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही जरूर स्वामींची ही नित्यसेवा केली तरी यामुळे तुम्हाला या पूजेचे फळ नक्कीच प्राप्त होईल. स्वामींचा कृपाशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल. स्वामींचे अनुभव नक्कीच येतील. तर अशाप्रकारे तुम्ही देखील स्वामींची नित्यसेवा अवश्य करा. स्वामी तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.