Tuesday, July 29, 2025
Homeअध्यात्मकाळा धागा कोणी, कधी आणि कोणत्या पायात बांधावा?

काळा धागा कोणी, कधी आणि कोणत्या पायात बांधावा?

मित्रांनो आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपल्याला विविध गोष्टींची माहिती पाहायला मिळते. अनेक रूढी परंपरा आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत. बरेच जण याचे पालन देखील करताना आपल्याला पाहायला मिळतातच. परंतु आपल्यापैकी बरेच जण याच्याकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्षित करीत राहतात. परंतु मित्रांनो या परंपरा असण्यामागे काहीना काही उद्देश असतो. तर आपल्यापैकी बरेच जण हे अनेक प्रकारचे दोरा आपल्या शरीरावरती बांधत असतात. म्हणजे हाताला, पायाला अनेक प्रकारच्या रंगाचा दोरा बांधत असतात.

तर आज मी तुम्हाला काळ्या रंगाचा धागा हा कोणी, कधी आणि कोणत्या पायात बांधायचा आहे जेणेकरून त्याचे आपल्याला लाभ होतील हे सविस्तर सांगणार आहे. तर काळा धागा बांधणे हे आपल्यासाठी खूपच शुभ मानले गेलेले आहे. परंतु काळा धागा बांधत असताना तो अभिमंत्रित करूनच आपल्या पायात बांधायचा असतो. म्हणजे तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तो अभीमंत्रीत करू शकता किंवा तुम्ही घरामध्ये दोरा आपल्यासमोर ठेवून रुद्र गायत्री मंत्राचा जप करून तो अभिमंत्रित करून आपल्या पायाला बांधू शकता.

म्हणजेच काळा धागा बांधत असताना तो अभिमंत्रित करूनच आपल्या पायाला बांधायचा आहे. तर घरातील जे पुरुष आहेत या पुरुषांनी आपल्या उजव्या पायाला काळा धागा बांधायचा आहे. तसेच स्त्रियांनी म्हणजेच महिलांनी आपल्या डाव्या पायाला काळा धागा बांधायचा आहे. म्हणजे पुरुषांनी उजव्या पायात काळा धागा बांधल्याने त्यांना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतात.

तसेच महिलांनी आपल्या डाव्या पायात हा काळा धागा बांधल्याने त्यांना शुभ परिणाम पाहायला मिळतील. तसेच अनेक लोकांना पोट दुखीचा त्रास असेल तर त्यांनी आपल्या डाव्या पायाच्या अंगठ्याला काळा दोरा बांधावा. यामुळे पोटदुखीची समस्या तुमची नक्कीच दूर होईल. काळा धागा आपल्या पायाला बांधल्यामुळे आपल्याला खूपच याचे लाभ देखील होतात.

परंतु काळा धागा बांधल्यानंतर कोणत्याही दुसऱ्या रंगाचा धागा आपणाला आपल्या पायाला किंवा शरीरावरती इतरत्र कुठेही बांधायचा नाही. तसेच काळा धागा बांधल्यानंतर तुम्ही दररोज गायत्री मंत्राचा एक वेळेस तरी जप करायचा आहे.

तसेच तुम्ही हा काळा धागा बांधत असताना तो शनिवारच्या दिवशी बांधायचा आहे आणि हेच आपल्या शास्त्रामध्ये खूपच शुभ मानले गेलेले आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांचा मंगळ ग्रह असल्याने या राशीतील लोकांनी काळा धागा अजिबात बांधायचा नाही. कारण हा धागा यांच्यासाठी अशुभ असतो. त्यामुळे मेष आणि वृश्चिक राशीतील लोकांनी काळा धागा अजिबात बांधायचा नाही.

तर अशा प्रकारे तुम्ही शनिवारच्या दिवशी काळा धागा आणून तो अभिमंत्रित करूनच आपल्या पायाला बांधायचा आहे. यामुळे मग आपल्या जीवनामध्ये त्याचे शुभ परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. वाईट शक्तींपासून आपले संरक्षण होईल.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -