मित्रांनो प्रत्येकालाच आपल्या जीवनामध्ये काही ना काही अडीअडचणी या येतच असतात. तसेच अनेक कामांमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येऊन ते आपले काम पूर्ण होत नाही. तसेच घरातील लोकांचे आरोग्य सतत बिघडत जाते आर्थिक टंचाई असेल तर यासाठी आपण खूपच त्रस्त झालेलो असतो. त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतो मंत्रांचा जप करतो व्रत उपवास करून देवतांकडे प्रार्थना देखील करीत असतो. परंतु एवढे करून देखील आपल्याला काहीच फरक जाणवत नाही.
तर आज मी तुम्हाला पंचमहायज्ञा बद्दल सांगणार आहे. जर तुम्ही पंचमहायज्ञ रोज केला तर यामुळे तुमच्या जीवनामध्ये फरक नक्कीच दिसेल. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील ज्या काही अडचणी, बाधा आहेत किंवा आरोग्याच्या संबंधित समस्या असतील किंवा आर्थिक टंचाई असतील त्या सर्व दूर होणार आहेत. तर मित्रांनो पंचमहायज्ञ म्हणजेच पाच प्रकारची कामे म्हणजेच तुम्हाला दररोज ही पाच प्रकारची कामे करायची आहेत.
म्हणजेच या पाच प्रकारच्या कामांना यज्ञ संबोधले जाते. त्यातील पहिले काम म्हणजेच देवयज्ञ. तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला अग्नीवर एक चमचा तूप सोडायचे आहे. मग तुम्ही घरातील गॅस वरती किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा अग्नि पेटवून त्यावरती देखील तुम्ही एक चमचा तूप घातले तरीही चालते. यामुळे तुमची जी काही अडकलेली कामे असतील या अग्नीसोबत सर्व अडचणी दूर होतील कामात येणारी बाधा दूर होईल.
दुसरे यज्ञ म्हणजे ऋषी यज्ञ. यामध्ये तुम्हाला सकाळी गाईला एखादा अन्नाचा घास घालायचा आहे. म्हणजेच एक चपाती देखील तुम्ही त्या गाईला खाऊ घालायचे आहे. तसेच तिसरे यज्ञ म्हणजे पितृ यज्ञ. तुम्हाला बाराच्या नंतर कावळ्यांना अन्न खाऊ घालायचे आहे. म्हणजेच तुम्ही अर्धी चपाती असो किंवा एक चपाती आपल्या घराच्या गच्चीवर किंवा समोर परिसरामध्ये तुम्ही ठेवू शकता. जेणेकरून ते कावळे खातील म्हणजेच हा आपला पितृ यज्ञ होईल.
चौथा यज्ञ म्हणजेच मनुष्य यज्ञ. तुम्ही दररोज एखाद्या व्यक्तीला अन्न खाऊ घालायचे आहे. म्हणजेच एखादा जरी भिक्षुक काही मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नये. तर त्याला काही ना काही खाऊ द्यायचे आहे किंवा एखादा अतिथी आपल्या घरी आला तर त्याला चहा किंवा जेवण आपण नक्कीच द्यायचे आहे.
जर दिवसभरात कोणीच आले नाही तर तुम्ही एखाद्या मंदिरात जाऊन एखाद्या गरीब व्यक्तीला अन्न खाऊ घालू शकता. पाचवे यज्ञ आहे ते म्हणजे भूत यज्ञ. तर मित्रांनो दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्ही आपल्या घराच्या बाहेर एका कोपऱ्यामध्ये थोडीशी साखर मुंग्यांना खाऊ घालायची आहे. जेणेकरून आपले हे भूत यज्ञ होईल.
तर अशा प्रकारे मित्रांनो हे पंचमहायज्ञ आपल्याला रोज करायचे आहेत म्हणजेच देव यज्ञ, ऋषी यज्ञ, पितृ यज्ञ, मनुष्य यज्ञ आणि भूत यज्ञ असे ही पंचमहायज्ञ तुम्ही जर दररोज आपल्या घरी केला तर यामुळे आपल्या सर्व अडचणी नक्कीच दूर होणार आहेत. अडकलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि आपले कुटुंब नेहमी सुख समृद्धीने नांदेल. एक प्रकारचा गोडवा आपल्या नात्यांमध्ये निर्माण होईल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.