आजरा येथील एकता काॅलनीत पाण्याच्या मोटरचा शॉक लागून अनिता संभाजी कांबळे (वय ४३) ही महिला जागीच मयत झाली. ही घटना आज, बुधवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली.बिरजे या महिलेलाही शाॅक लागला मात्र सुदैवाने ती बचावली.
अनिता कांबळे या सकाळी ८.३० च्या सुमारास पाण्याची मोटर चालू करण्यासाठी गेल्या असता त्यांना शाॅक लागला. शॉक लागल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला. मात्र त्या विजेच्या धक्क्याने जमिनीवर पडल्या व त्याच ठिकाणी उपचारापूर्वीच मयत झाल्या.
आरडाओरड झाल्याने शेजारील सरोज बिरजे या धावत आल्या. व त्यांनी अनिता कांबळे यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यांनाही वीजेचा शाॅक लागला पण सुदैवाने त्या बचाविल्या. अनिता कांबळे यांच्या पतीचे यापूर्वीच निधन झाले असून त्यांच्या पश्चात एक मुलगा आहे. या घटनेने एकता काॅलनीवर एकच शोककळा पसरली आहे.
आजऱ्यात विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू शेजारील वाचवायला गेलेली महिला सुदैवाने बचावले
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -