मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना या निकालाची उत्कंठा आहे. परंतु, याचा अर्थ सर्व जण धास्तावलेले आहेत, असं काही नाही. जो काही निर्णय राहील तो आम्हाला मान्य राहणार असल्याचं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितलं.
महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी समोर आली. उद्या सत्तासंघर्षावरील निकाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यासंदर्भात बोलाताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले, कायदेशीर बाबी आम्ही तपासल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, अशी अपेक्षा आहे. सत्ता संघर्षावर उद्या पडदा पडणार आहे. ज्यांनी त्यांनी आपल्याला आपल्या पद्धतीनं मत मांडण्यास सुरूवात केली. 16 आमदारांच्या यादीतील मी एक आमदार आहे. सर्वांना निकालाची उत्सुकता आहे. याचा अर्थ सर्वजण टीव्ही समोर बसतील, असा नव्हे. सर्व जण आपआपल्या कामात व्यस्त आहेत. मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना या निकालाची उत्कंठा आहे. परंतु, याचा अर्थ सर्व जण धास्तावलेले आहेत, असं काही नाही. जो काही निर्णय राहील तो आम्हाला मान्य राहणार असल्याचं शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी सांगितलं
सत्ता संघर्षावरील निकाल उद्या लागणार, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया काय?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -