Wednesday, July 30, 2025
Homeसांगलीबनावट सोने देऊन सांगली जिल्हा बँकेची 25 लाखाची फसवणूक आठ जणांवर गुन्हा...

बनावट सोने देऊन सांगली जिल्हा बँकेची 25 लाखाची फसवणूक आठ जणांवर गुन्हा दाखल; दोघांना अटक

जत तालुक्यातील सोरडी येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत बनावट सोने देऊन शाखेची 25 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सात कर्जदार व सराफ अशा आठजणांवर गुन्हा दाखल झाला होता.फसवणूकप्रकरणी शहाजी मारुती तुराई (वय 30, रा. राजोबावाडी), संजय विठ्ठल सावंत (वय 45) यांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात उभे केले असता, पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोरडी शाखेत 26 ऑक्टोबर 2022 ते 13 एप्रिल 2023 या कालावधीत सोने कर्ज खातेदार शहाजी मारुती तुराई, अस्लम अमिन मुलाणी, धोंडाप्पा भीमराम गावडे, आशाबाई अप्पासाहेब टेंगले, धनाजी भीमराव पुजारी, अंकुश सदाशिव मलमे, माय्याका भिवा गावडे यांनी व्हॅल्युएटर सावंत यांच्याशी संगनमत करून बँकेत सोन्याच्या बनावट 17 वस्तू ठेवून फसवणूक केल्याचे उघड झाले होते.

बँकेचा व्हॅल्युएटर सराफ संजय विठ्ठल सावंत (रा. माडग्याळ) याने ते सोने खरे असल्याचे मूल्यांकन लेखी स्वरूपात बँकेच्या कर्जरोख्यांच्या नमुन्यामध्ये सही-शिक्क्याने प्रमाणित केले होते. या वस्तू बँकेत तारण देऊन एकूण कर्ज 25 लाख 73 हजार रुपये घेण्यात आले. सात कर्जदार व व्हॅल्युएटर सराफ संजय विठ्ठल सावंत यांनी संगनमत करून बँकेच्या सोरडी शाखेची फसवणूक केली आहे. यातील शहाजी तुराई व व्हॅल्युएटर सावंत या दोघांना अटक करण्यात आली असून, त्यांना 13 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -