पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान लढतीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सध्याच्या वृत्तानुसार, 15 ऑक्टोबर रोजी पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असतील.
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा भारतात होणार आहे. ही स्पर्धा ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. या स्पर्धेबाबत एक मोठं अपडेट समोर आलं आहे.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, अहमदाबाद येथे होणाऱ्या वनडे विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात गतविजेता इंग्लंड आणि उपविजेता न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत.
भारतीय संघ आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. चेन्नईचे चेपॉक स्टेडियम या महत्त्वपूर्ण सामन्याचे आयोजन करणार असल्याचे वृत्त आहे.
या स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. अहमदाबाद किंवा कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आणखी एक उपांत्य फेरीचा सामना होण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचे सर्व सामने अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरू येथे होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
सध्याच्या माहितीनुसार, एकदिवसीय विश्वचषक 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. वेळापत्रक निश्चित झालेले नाही. त्यामुळे प्रारंभ किंवा समाप्तीच्या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे.
भारत पाकिस्तान मॅच ची ठरली तारीख
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -