Thursday, July 31, 2025
Homeक्रीडादिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? चेन्नईचा 'सुपर' 'सुपर' विजय!

दिल्ली कॅपिटल्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? चेन्नईचा ‘सुपर’ ‘सुपर’ विजय!

चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये प्ले ऑफच्या दिशेने मोठी झेप घेतली. दिल्ली कॅपिटल्सवर विजय मिळवून पॉईंट टेबलवर त्यांनी १५ गुणांसह दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली. डीसी चे मात्र प्ले ऑफस मधील आव्हान संपुष्टात आले. १९ सामन्यांत ७ पराभवांमुळे त्यांना तळावरच राहावे लागले. इम्पॅक्ट खेळाडू मथिषा पथिराणाने थ ओव्हरमध्ये दोन महत्त्वाच्या विकेट विकेट घेत SN सामना फिरवला. दीपक चहरने सुरूवातीलाच दोन मोठे धक्के दिले होतेच. दिल्लीला आता शर्यतीत कायम राहण्यासाठी उर्वरित ३ सामने जिंकावे तर लागतीलच, शिवाय अन्य संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावे लागेल. . दिल्लीची सुरूवातही काही र | खास झाली नाही. दुसऱ्याच चेंडूवर दीपक चहरने डीसीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरला (०) झेलबाद केले. फिल सॉल्ट ( १७) चांगली फटकेबाजी करत होता आणि तिसऱ्या षटकात चहरने हाही काटा काढला. मनीष पांडे इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानावर आला, परंतु त्याच्या चुकीच्या कॉलवर मिचेल मार्श रन आऊट झाला. दिल्लीला २५ धावांत तिसरा धक्का बसला आणि पॉवर प्लेमध्ये त्यांना ४८ धावा करता आल्या. पांडे व रिली रोसोवू यांनी चांगली खेळी करून दिल्लीचा डाव सावरला आणि ५१ चेंडूंत अर्धशतकीय भागीदारी पूर्ण केली.

फिरकीला पोषक खेळपट्टीवर धोनी इम्पॅक्ट प्लेअर
र म्हणून फिरकीपटू मिचेल सँटनरला आणेल असा अंदाज होता. पण, धोनीने मथिषा पथिराणाला बोलावले अन त्याने त्याच्या पहिल्याच षटकात कमाल केली. २७ धावांची खेळी करून रोसोवूसह ५९ धावांची भागीदारी करणाऱ्या पांडेला त्याने पायचीत केले. दिल्लीला ३६ चेंडूंत ८० धावा करायच्या होत्या आणि रवींद्र जडेजाने डीसीचा सेट फलंदाज रोसोवूला (३५) झेलबाद केले. अक्षर पटेलने चांगली लढत दिली, परंतु धावा अन् चेंडू यांच्य यांच्यातली वाढलेली दरी कमी करण्याच्या प्रयत्नात तो २१ करण्याच्य धावांवर बाद झाला. इथे दिल्लीच्या हातून मॅच गेली. १२ चेंडूंत ४८ धावा दिल्लीला करायच्या होत्या. ललित होत्या. लालत यादवने २०व्या षटकात  सलग तीन चौकार मारून १२ धावांवर बाद झाला. दिल्लीला ८ बाद १४० धावा करता आल्या.

चेन्नईने २७ धावांनी सामना जिंकला. पथिराणाने तीन न विकेट्स घेतल्या. अंबाती रायडूने आयपीएलमध्ये केली कमाल एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात अंबाती 1 अबाती रायडूने मैदानावर पाऊल ठेवताच आयपीएलमध्ये २०० सामने खेळणारा तो नववा क्रिकेटपटू ठरला आहे. २०० आयपीएल सामने खेळल्यामुळे, तो महेंद्रसिंग धोनी, दिनेश कार्तिक, विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या दिग्गजांच्या विशेष क्लबमध्ये सामील झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -