Friday, August 1, 2025
Homeकोल्हापूरआजरयाजवळ गव्याचा हल्यात एक जण गंभीर जख्मी

आजरयाजवळ गव्याचा हल्यात एक जण गंभीर जख्मी

आजरयाजवळील कासारशेत येथे ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेलेले शेतकरी गुंडू भैरु केसरकर (वय ८०) हे गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेतसदरची घटना आज गुरुवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.

आजरा शहरातील चर्चगल्लीतील गुंडू केसरकर यांचे कासारशेत येते शेत आहे. सदरच्या शेतात आज गुरुवारी सकाळी केसरकर ऊसाला पाणी पाजण्यासाठी गेले होते. दरम्यान सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर अचानक गव्याने हल्ला केला. यामध्ये केसरकर यांच्या पोटाला गव्याचे शिंग लागले असून उजव्या हाताजवळ गंभीर दुखापत झाली आहे.

तातडीने वनपाल एस. के. निळकंठ यांच्या मदतीने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचाराकरिता कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे. गव्याच्या हल्ल्याने आजरा परिसरामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -