Friday, May 17, 2024
Homeसांगलीलिफ्ट च्या बहाण्याचे वृद्धेस लुटले

लिफ्ट च्या बहाण्याचे वृद्धेस लुटले

सांगली येथील कुपवाड रस्त्यावर सुरेखा वीरकुमार शहा (वय 73) यांना दुचाकीवरून ‘लिफ्ट’ देण्याच्या बहाण्याने सहा ग्रॅम वजनाची सोनसाखळी लंपास केलीबायपास रस्त्यावर मंगळवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी रात्री उशिरा अज्ञात चोरट्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेखा शहा टिंबर एरियातील पोस्ट कार्यालयात निघाल्या होत्या. संशयित चोरटा पाठीमागून दुचाकीवरून आला. त्याने ‘आज्जी कुठे निघाला आहात’, अशी विचारणा केली. शहा यांनी पोस्ट कार्यालयात निघालो आहे, असे सांगितले. यावर चोरट्याने ‘मी तिकडेच निघालो आहे, तुम्हाला दुचाकीवरून सोडतो’, असे सांगितले. शहा दुचाकीवर बसण्यास तयार झाल्या.

चोरट्याने दुचाकी थेट कॉलेज कॉर्नरवरून बायपास रस्त्याकडे नेली. बायपास रस्त्यावर गेल्यानंतर चोरट्याने सोनसाखळी घेऊन तेथून दुचाकीसह पलायन केले.

शहा खूप वेळ तिथे थांबून होत्या. पण चोरटा परत आलाच नाही. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तेथील काही लोकांची मदत घेऊन त्या घरी गेल्या. घरातील लोकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर रात्री उशिरा त्यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फुटेज तपासणीचे काम सुरू केले आहे. या गुन्ह्याचा छडा लावण्यात यश येईल, असे पोलिसांनी सांगितले. भांडण सुरू आहे, दागिने काढून द्या चोरट्याने सुरेखा शहा यांना मोटारसायकलवरून बायपास रस्त्यावर घेऊन गेला. त्या ठिकाणी त्यांना ‘आज्जी, पुढे भांडणे सुरू आहेत, तुमच्या गळ्यातील सोनसाखळी काढून माझ्याकडे द्या’, असे सांगितले. शहा यांनी सोनसाखळी देताच, त्याने ‘मी भांडण मिटले आहे का’, हे पाहून येतो’, असे म्हणून पलायन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -