आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात असणाऱ्या जोंधळखिंडी या गावात घडली आहे. विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आपला सहा वर्षाचा मुलगा प्रेमसंबंधात अडसर ठरतोय म्हणून जोती प्रकाश लोंढे हिने तिचा प्रियकर रुपेश घाडगे याच्या मदतीने त्याला संपविण्याचा कट रचला.त्यानुसार तिने आपल्या मुलाचे अपहरण झाल्याचा बनाव करत पोलिसात तक्रार दिली होती.
विटा पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत विविध तांत्रिक बाबींच्या आधारे सखोल तपास केला. या तपासातून सदर मुलाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. रुपेश घाडगे याने या मुलाला आपल्या दुचाकीवर घेऊन रस्त्यातील एका विहिरीत टाकले. यामध्ये त्या मुलाचा मृत्यू झाला. या कृत्यात त्या मुलाची आई जोती ही देखील सहभागी होती. तिनेच स्वतःच्या मुलाला सीम कार्ड देण्याच्या बहाण्याने आरोपीकडे पाठवले होते. पोलीसी खाक्या दाखवताच दोघांनी आपला गुन्हा कबूल केला असून पोलिसांनी तात्काळ या घटनेतील दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या मदतीने पोटच्या मुलाचा जीव घेण्याच्या या घटनेने सांगली जिल्हा हादरला आहे.
सांगली जिल्हा हादरला , प्रियकराच्या मदतीने आईनेच घेतला पोटच्या मुलाचा जीव
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -