Wednesday, July 30, 2025
Homeकोल्हापूरसोशल मीडियावर आक्षपार्ह पोस्ट, आजऱ्यात तणावपूर्ण वातावरण

सोशल मीडियावर आक्षपार्ह पोस्ट, आजऱ्यात तणावपूर्ण वातावरण

सोशल मिडीयावरून एका समाजाच्या भावना दुखावतील अशी पोस्ट एका युवकाने व्हायरल केल्याप्रकरणी संबधित युवकाच्या अटकेच्या मागणीसाठी आजरा शहरात बुधवार (दि.१०) रोजी रात्री तणावाचे वातावरण होते.यामुळे गुरूवार (दि. ११) रोजी आजरा शहर बंदची हाक दिली होती. या बंदला गुरूवारी सकाळी उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यानंतर शांतता समितीची बैठक झाली. त्यामध्ये आजरा बंद मागे घेण्यात आला. तसेच आजरा शहरातील वातावरण दिवसभर तणावपूर्ण शांततेचे आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बुधवारी सायंकाळी एका युवकाने सोशल मिडीयावरून एका समाजाच्या भावना दुखावतील अशी पोस्ट व्हायरल केली. यामुळे शहरातील नागरीक मोठ्या संख्येने नविन पोलीस स्टेशनच्या दारात जमा झाले. यावेळी संबधित युवकाला अटक करण्याच्या मागणीसाठी त्यांनी पोलीस स्टेशनच्या दारात ठिय्या मांडला. तसेच गुरूवारी आजरा बंदची हाक दिली. यामुळे शहरातील वातावरण तणावमय बनले होते. अखेर रात्री उशीरा संबधित युवकावर गुन्हा नोंद झाला. तसेच रात्री तीन वाजण्याच्या सुमारास स्थनिक गुन्हे अन्वेषण शाखेने युवकाला ताब्यात घेतले. गुरूवारी सकाळी आजरा शहर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर सकाळी अकरा वाजता तहसिल कार्यालयात शांतता समितीची बैठक झाली.

तसेच शहरातील व्यापारी व विविध समाजाच्या नागरिक उपस्थित होते. शांतता समितीच्या बैठकीत शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सकाळच्या सत्रात बंद शांततेत पार पडल्यामुळे बंद मागे घेत असल्याचे सांगण्यात आले. यामुळे शहरातील जनजीवन पूर्वपदावर आले. मात्र शहरातील तणावपूर्ण शांतता कायम होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -